चेंबुरमध्ये अग्नितांडव, अकराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

मुंबई : आगीच्या घटनांची मालिका मुंबईत सुरुच आहे. चेंबुरमधील टिळकनगरच्या सरगम इमारतीच्या 14 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झालाय. तर एक जण जखमी झालाय. सुनिता जोशी (वय 72 वर्षे), भालचंद्र जोशी (वय 72 वर्षे), सुमन श्रीनिवास जोशी (वय 83 वर्षे) आणि इतर दोन जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान […]

चेंबुरमध्ये अग्नितांडव, अकराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : आगीच्या घटनांची मालिका मुंबईत सुरुच आहे. चेंबुरमधील टिळकनगरच्या सरगम इमारतीच्या 14 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झालाय. तर एक जण जखमी झालाय. सुनिता जोशी (वय 72 वर्षे), भालचंद्र जोशी (वय 72 वर्षे), सुमन श्रीनिवास जोशी (वय 83 वर्षे) आणि इतर दोन जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.

संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान इमारत क्रमांक 35 च्या 14 व्या मजल्यावर आग लागली. या घरातील लोक घाबरून बाहेर पळाले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयन्त केला.

रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास अनेक अडचणी आल्या. तसेच इमारतीमध्ये कार पार्क केल्याने अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास बराच वेळ गेला. अग्निशमन दल अकराव्या मजल्यावर पोहोचले. या आगीत काही जण अडकले होते, तर काही जण इमारतीच्या टेरेसवर जीव वाचवण्यासाठी गेले होते.

या सर्वांना अग्नीशमन दलाने सर्वांना सुरक्षित ठिकाणी आणलं आणि सुटका केली. पण गुदमरून पाच जणांचा मृत्यू झालाय. जखमीवर सध्या उपचार सुरु आहेत.

मुंबईत राहणारे नागरिक खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न सातत्याने उपलब्ध होतोय. मुंबईतील आगीच्या घटनांची मालिका सुरुच आहे आणि यामध्ये अनेकांचा जीव जातोय. इमारतीमध्ये अग्नीरोधक उपायांची कमतरता, खबरदारी न घेणे, अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी नीट रस्ता नसणे अशा अनेक कारणांमुळे जीव जात आहेत.

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.