मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार; आता विरोधी पक्षनेते रवी राजांचाही नारा

| Updated on: Jul 11, 2021 | 5:52 PM

काँग्रेस नेत्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केलेली आहे. आता महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनीही महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. (ravi raja)

मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार; आता विरोधी पक्षनेते रवी राजांचाही नारा
ravi raja
Follow us on

मुंबई: काँग्रेस नेत्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केलेली आहे. आता महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनीही महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस महापालिका निवडणूक आघाडी करून लढणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. (mumbai congress protest in mumbai against fuel price hike)

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांनी स्वबळाचा नारा कायम ठेवला आहे. आम्ही स्वबळावर लढू. आगामी महापौर काँग्रेसचाच होईल, असं रवी राजा यांनी स्पष्ट केलं आहे.

सायनमध्ये जोरदार आंदोलन

काल काँग्रेसने मुंबईत इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी आंदोलन केलं. यावेळी बैलगाडी कोसळली. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाली पडले. काँग्रेसच्या आंदोलनाला होणारी गर्दी, सोशल डिस्टन्सिंनचा उडालेला बोजवारा यावरून काँग्रेसवर टीका होत आहे. परंतु, आज रवी राजा यांच्या नेतृत्वात सायन येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं. मानवी साखळी करून हे आंदोलन करण्यात आलं होतं.

वॉर्डावॉर्डात आंदोलन

काँग्रेस आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी काँग्रेसने मुंबईत ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. तसेच आगामी काळात वॉर्डावॉर्डात जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसने जाहीर केला आहे.

आंदोलन सुरूच

दरम्यान काँग्रेस पक्षाने महागाई व इंधन दरवाढीविरोधात 10 दिवसांचे आंदोलन सुरू केलेलं आंदोलन आजही सुरूच आहे. आजही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून भाजप सरकारचा निषेध नोंदवला. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चुली पेटवून भाकरी शेकल्या, तर पुरुष कार्यकर्त्यांनी सायकल आणि बैलगाडीतून प्रवास करत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदवला. काही ठिकाणी महागाईची तिरडी काढण्यात आली, तर काही ठिकाणी मोटारसायकल आणि गॅस सिलिंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली. वाढत्या महागाईच्याविरोधात काँग्रेसने राज्यभरात अनोखं आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला आहे. (mumbai congress protest in mumbai against fuel price hike)

 

संबंधित बातम्या:

रस्त्यावर चुली मांडल्या, महागाईची तिरडी, मोटारसायकलची अंत्ययात्रा, सायकलवरून प्रवास; काँग्रेसचं आंदोलन पेटलं

Video | “हमारा नेता कैसा हो…” म्हणताच बैलगाडी तुटली, काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप कोसळले, व्हिडीओ व्हायरल

कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली तेव्हा गप्प बसले, मुंबईकर भाजपला ओळखून बसलेत : भाई जगताप

(mumbai congress protest in mumbai against fuel price hike)