Video | “हमारा नेता कैसा हो…” म्हणताच बैलगाडी तुटली, काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप कोसळले, व्हिडीओ व्हायरल

या आंदोलनामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आणलेली बैलगाडी अचानकपणे तुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले.

Video | हमारा नेता कैसा हो... म्हणताच बैलगाडी तुटली, काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप कोसळले, व्हिडीओ व्हायरल
BHAI JAGTAP MUMBAI CONGRESS ACCIDENT WHILE PROTEST
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 5:30 PM

मुंबई : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीचा प्रश्न काँग्रेसने लावून धरला आहे. या दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन केले जात आहे. काँग्रेसने मुंबईतही अशाच प्रकराच्या जनआंदोलनाचे आज (10 जुलै) आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनादरम्यान एक विचित्र घटना घडली. या आंदोलनामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आणलेली बैलगाडी अचानकपणे तुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai jagtap) बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या व्हायरल होत आहे. (Mumbai Congress activists and Bhai jagtap collapse from Bullock cart while protesting against Petrol Diesel price hike)

काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन

मागील अनेक दिवसांपासून देशभरात सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. अनेक राज्यांत पेट्रोल शंभरीपार गेले आहे. याच कारणामुळे राज्यात काँग्रेसतर्फे मागिल काही दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई काँग्रेसनेसुद्धा आज अशाच प्रकारचे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी आंदोलनामध्ये एक बैलगाडी आणण्यात आली होती.

भाई जगताप जमिनीवर कोसळले 

या बैलगाडीवर उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते तसेच भाई जगताप केंद्र सरकारविरोधात घोषणा देत होते. तसेच “देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो !” अशासुद्धा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त लोक या बैलगाडीवर चढल्यामुळे ती जागेवरच तुटली. परिणामी कांग्रेस कार्यकर्तेही खाली कोसळले. बैलगाडीमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हेसुद्धा उभे होते. बैलगाडी अचानकपणे तुटल्यामुळे तेसुद्धा जमिनीवर कोसळले.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान ही घटना घडल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक खोचक ट्वीट केले आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करुन माणसाने झेपेल तेच करावं असा खोचक सल्ला भाई जगताप यांना दिला आहे.

इतर बातम्या :

भाजपचे कार्यकर्ते पुन्हा शिवसेना भवनावर धडकण्याची शक्यता; शिवसैनिकांचा कडेकोट बंदोबस्त

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त, विनायक राऊतांची मोठी घोषणा

मंत्रिपद आणि अध्यक्षपद सेनेकडे रहावं, काँग्रेस राष्ट्रवादीला माझी विनंती, मी अध्यक्ष झालो तर आनंदच, फायरब्रँड भास्कर जाधवांची रोखठोक मतं

(Mumbai Congress activists and Bhai jagtap collapse from Bullock cart while protesting against Petrol Diesel price hike)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.