भाजपचे कार्यकर्ते पुन्हा शिवसेना भवनावर धडकण्याची शक्यता; शिवसैनिकांचा कडेकोट बंदोबस्त

आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपने शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. बारा आमदारांना निलंबित केल्याप्रकरणी हे आंदोलन सुरु आहे.

भाजपचे कार्यकर्ते पुन्हा शिवसेना भवनावर धडकण्याची शक्यता; शिवसैनिकांचा कडेकोट बंदोबस्त
ShivSainik at shivsena Bhavan १
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 2:28 PM

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादर, वरळी, माहिम, माटुंगा या भागात शिवसेना-भाजप वारंवार समोर येत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना भवन येथे झालेल्या राड्यानंतर भाजपने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसलं आहे.  (BJP agitation at shivaji park Many ShivSainik at shivsena Bhavan)

शिवसैनिकांकडून शिवसेना भवन परिसरात बंदोबस्त

आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपने शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. बारा आमदारांना निलंबित केल्याप्रकरणी हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते सेनाभवन परिसरात येण्याची शक्यता आहे. यामुळे असंख्य शिवसैनिकांनी शिवसेना भवन परिसरात मोठी गर्दी केली आहे. अनेक शिवसैनिक हे सेना भवन परिसरात जमा झाले आहेत. या शिवसैनिकांकडून शिवसेना भवन परिसरात बंदोबस्त दिला जात आहे.

शिवसेना भवन ही पवित्र वास्तू, मोर्चा काढणे चुकीचे

मागच्या प्रकरण झाल्यानंतर त्यांना आम्ही धडा शिकवला होता. भाजपने त्यातून बोध घ्यायला हवा होता. पण दुर्देवाने भाजप ही जुनी भाजप राहिलेली नाही. भाजपमध्ये काही नवीन लोकांना प्रवेश दिल्याने त्यांना शिवसेना भवनाचे महत्त्व माहिती नाही. जुन्या लोकांना त्याचे महत्त्व माहिती होते. ती पवित्र वास्तू आहे. या पवित्र वास्तूमुळे भाजपही महाराष्ट्रात मोठी झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मोर्चा काढणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती विधानसभेत दिली.

(BJP agitation at shivaji park Many ShivSainik at shivsena Bhavan)

संबंधित बातम्या : 

संजय राऊत म्हणाले, शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी, अजितदादा म्हणतात….

‘होय… शिवसेना गुंडगिरी करते, शिवसेना भवनावर आंदोलन करायचं नाही’, संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय ठाकरे सरकारनं का घेतला? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत 

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.