मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर काढलेल्या मोर्चावेळी मोठा राडा झाला. काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्याबाबत माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह 7 शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल झालाय. त्याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला थेट इशारा दिलाय. शिवसेना गुंडगिरी करते. त्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचं नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांना एकप्रकारे सज्जड दम भरलाय. (ShivSena MP Sanjay Raut’s warning to BJP)