AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी पाठलाग, अश्लील मेसेज अन् मग हिंदू मुली… नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, नेमकं काय घडलं?

मुंबईतील आग्रीपाडा येथे १९ वर्षीय तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ करणाऱ्या अश्रफ सिद्दिकीला अटक करण्यात आली आहे. या घटनेने मुंबईत खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आधी पाठलाग, अश्लील मेसेज अन् मग हिंदू मुली... नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, नेमकं काय घडलं?
mumbai
| Updated on: Apr 24, 2026 | 7:52 AM
Share

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण ताजे असतानाच, आता मुंबईतही तसाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १९ वर्षीय तरुणीला अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाठवून तिचा मानसिक छळ करणाऱ्या अश्रफ सिद्दिकी नावाच्या तरुणाला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मुंबई पालिका प्रभाग क्रमांक २०१ च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे मुंबईतील एका छोट्या कंपनीत टेलिकॉलर म्हणून काम करत होते. २१ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या दरम्यान आरोपी अश्रफ सिद्दिकी याने नोकरीसाठी मुलाखतीला आलेल्या मुलींचे मोबाईल नंबर मिळवले होते. या नंबरचा वापर करून तो मुलींना टार्गेट करत होता.

त्याने पीडित तरुणीला त्याने सतत फोन कॉल्स आणि व्हॉट्सॲपवर अश्लील मजकूर पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली होती. धक्कादायक म्हणजे, मेसेजमध्ये त्याने मला हिंदू मुलीच आवडतात असे विधान करत तिचा मानसिक छळ केला. केवळ मेसेजवर न थांबता आरोपीने या तरुणीचा पाठलाग केल्याचे समोर आले आहे. आरोपीने केवळ एकाच तरुणीला नाही, तर इतर ३ ते ४ हिंदू मुलींनाही अशाच प्रकारचे अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले होते. भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी या घटनेवर कॉर्पोरेट जिहादचा आरोप केला आहे. तसेच अशा प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणानंतर पीडित तरुणीने न डगमगता आपल्या वडिलांसह आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी अश्रफ सिद्दिकी याला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५४ आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर शिवसेना नेत्या आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. हे जे काही घडतंय ते अत्यंत चुकीचे आहे. मुलींना जाळ्यात ओढण्याचे हे प्रकार थांबले पाहिजेत. जर एखादी तरुणी प्रतिसाद देत नसेल, तर तिला असा त्रास देणे हे नीच मानसिकतेचे लक्षण आहे. पोलिसांनी ज्या तत्परतेने आरोपीला अटक केली, त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. पालकांनी आणि मुलींनी न घाबरता अशा नराधमांविरोधात समोर येऊन तक्रार करावी, आम्ही आणि आमचे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहोत, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. या प्रकरणाचा अधिक तपास आग्रीपाडा पोलीस करत आहे. तसेच आरोपीने अजून किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे, याचा शोध घेतला जात आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच