चायनीज बनवण्याचा मशीनमध्ये शर्ट अडकला अन्… मुंबईत मजूराचा दुर्दैवी मृत्यू

या कारखान्यात एका २२ वर्षीय मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सूरज यादव असे त्याचे नाव असून सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

चायनीज बनवण्याचा मशीनमध्ये शर्ट अडकला अन्... मुंबईत मजूराचा दुर्दैवी मृत्यू
दादर पोलीस स्टेशन
| Updated on: Dec 15, 2024 | 3:09 PM

Mumbai labour died : चायनीय बनवण्याचा मशीनमध्ये अडकून एका 22 वर्षीय मजूराचा मृत्यू झाल्याची खळबळ घटना मुंबईत घडली आहेत. मुंबईतील प्रभादेवी परिसरात ही घटना घडली. सूरज यादव असे या मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना धक्का बसला. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, दादरमधील प्रभादेवीच्या नरीमन भाटनगर भागात चायनीज बनवणारा कारखाना आहे. या कारखान्यात अनेक मजूर काम करतात. नुकतंच या कारखान्यात एका २२ वर्षीय मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सूरज यादव असे त्याचे नाव असून सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

दादरमधील प्रभादेवीच्या नरीमन भाटनगर भागात चायनीज बनवणारा कारखाना आहे. या कारखान्यात चायनीज बनवण्यासाठी मोठमोठ्या मशीन आहेत. या चायनीज बनवण्याच्या मशीनमध्ये सूरजचा शर्ट अडकला. त्यामुळे तो आत खेचला गेला. यानंतर मशीनमध्ये अडकून सूरजचा मृत्यू झाला.

संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच दादर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. अद्याप याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र हा मजूर नेमका कुठे राहतो, यावेळी घटनास्थळी किती कर्मचारी उपस्थित होते, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.