AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Dahi Handi 2024 : जबरदस्त, मुंबईत पहिल्याच प्रयत्नात ‘या’ मंडळाने लीलया रचले 9 थर, VIDEO

Mumbai Dahi Handi 2024 : मुंबईत दहीहंडी उत्सावाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मुंबईत पहिल्याच प्रयत्नात विक्रोळी येथे 9 थरांची सलामी देण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यात आज सर्वत्र ढाकुमाकुम, ढाकुमाकुम, 'बोल बजरंग बली की जय' हे स्वर कानावर ऐकायला मिळतायत.

Mumbai Dahi Handi 2024 : जबरदस्त, मुंबईत पहिल्याच प्रयत्नात 'या' मंडळाने लीलया रचले 9 थर, VIDEO
Jai jawan
| Updated on: Aug 27, 2024 | 11:03 AM
Share

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. सकाळपासूनच मुंबापुरीत ढाकुमाकुम, ढाकुमाकुम, स्वर कानावर ऐकायला मिळत आहेत. विविध गोविंदा पथकं आपल्या मंडळाची टी-शर्ट घालून दहीहंडी फोडण्यासाठी निघाली आहेत. मानवी मनोरे रचताना ‘बोल बजरंग बली की जय’ अशी घोषणा देत गोविंदा आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवतायत. मुंबई, ठाण्यात मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपये पारितोषिक असलेल्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाण्यात जवळपास 1354 दहीहंड्यांच आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबईत दोन मोठी गोविंदा पथक आहेत. माझगाव ताडवाडी आणि जय जवान. या दोन्ही गोविंदा पथकांच सर्वाधिक उंचीचे थर रचून मोठ्या पारितोषिकांच्या दहीहंड्या फोडण्याचा रेकॉर्ड आहे. जय जवान गोविंदा पथकाची उपनगरचा राजा अशी ओळख आहे. जय जवान गोविंदा पथक दरवर्षी 9 थर रचून हंड्या फोडते. माझगाव ताडवाडी गोविंदा पथक 8 थर लीलयाच रचते. माजी आमदार आणि मनसे नेते बाळा नांदगावकर या माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाशी संबंधित आहेत. पहिल्याच प्रयत्नात 9 थर

दरम्यान मुंबईत विक्रोळी टागोरनगर येथे 9 थर रचून सलामी देण्यात आली आहे. मुंबई उपनगरचा राजा अशी ओळख असलेल्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात 9 थरांची सलामी दिली. जोगेश्वरीच हे पथक मुंबईतील मानाच्या दहीहंड्या फोडून दुपारपर्यंत ठाण्यात दाखल होईल. ठाण्यात दरवर्षी मोठ्या पारितोषिकांच्या दहीहंड्या बांधल्या जातात. जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्षच्या दहीहंडीमुळे ठाण्यात दहीहंडी उत्सवाला ग्लॅमर मिळालं. पण मागच्या काही वर्षांपासून जितेंद्र आव्हान दहीहंडी उत्सव साजरा करत नाहीत. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सवाच आयोजन केलं जातं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.