AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत फ्रीजमध्ये रक्त, मुतारीजवळ अन्न, तुकाराम मुंढेंच्या FDA ने धाड टाकताच सगळं बाहेर आलं; 7 आस्थापनांचे परवाने निलंबित!

अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत धडक मोहीम हाती घेतली आहे. नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छता मानकांचे गंभीर उल्लंघन आढळल्याचा एफडीएचा दावा आहे. यासह सात अस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत.

मुंबईत फ्रीजमध्ये रक्त, मुतारीजवळ अन्न, तुकाराम मुंढेंच्या FDA ने धाड टाकताच सगळं बाहेर आलं; 7 आस्थापनांचे परवाने निलंबित!
Image Credit source: Money 9 वरून
| Updated on: Sep 17, 2026 | 8:17 PM
Share

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आपली धडक मोहीम तीव्र केली आहे. एफडीएच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे विराजमान झाल्यापासून कारवायांचा धडाका सुरू आहे. ऐन सणासुदीच्या काळात भेसळीचे अनेक प्रकार समोर येत असतात. त्यात गेल्या काही दिवसांपासून एफडीएने धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे नियम न पाळणाऱ्यांची काही खैर नाही. या धडक मोहिमेत मुंबईतील प्रसिद्ध नायर रुग्णालयाचे कॅन्टीन आणि कुलाब्यातील ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस’सह शहरातील एकूण सात मोठ्या अन्न आस्थापनांचे परवाने एफडीएने तातडीने निलंबित केले आहेत. अन्न सुरक्षा व स्वच्छता मानकांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी ही कडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे एफडीएच्या तपासणीत समोर आले. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने एफडीएने तातडीने पाऊल उचलत या कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

ऑलिम्पिया कॉफी हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार

कुलाब्यातील प्रसिद्ध ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस’विरोधात ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनंतर एफडीएच्या पथकाने तेथे अचानक भेट दिली. या तपासणीत अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आले आहेत. हॉटेलच्या मूत्रालयाजवळ थेट अन्नाची साठवणूक केली जात असल्याचे आढळले. स्वयंपाकघर आणि भांडी धुण्याची व्यवस्था अत्यंत अस्वच्छ होती. रेफ्रिजरेटरमध्ये मांसाहारी रक्ताचे अवशेष आढळले, तसेच कच्चे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ कोणत्याही विभाजनाशिवाय एकत्र कोंबले होते.  तसेच हॉटेलमधील 35 अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 34 जणांकडे आवश्यक असणारे अन्न सुरक्षा प्रशिक्षण नव्हते.

‘ब्लिंक कॉमर्स’सह इतर आस्थापनांवरही कारवाई

एफडीएने चेंबूरमधील ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या क्विक-कॉमर्स डिलिव्हरी सेंटरसह घाटकोपरमधील प्रसिद्ध ‘विश्वास स्वीट्स अँड स्नॅक्स’ आणि ‘ए-1 जनरल अँड ड्राय फ्रूट्स’ या दोन्ही दुकानांवर कारवाई केली आहे. यासोबतच वरळीतील ‘मिलन पंजाब’आणि मालाड पूर्वेतील ‘सद्गुरू स्वीट्स’ या नामांकित हॉटेल व मिठाई दुकानांचे परवानेही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या सर्व संबंधित आस्थापनांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कडक कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...