Ghatkopar Fire: मुंबईतील २५ मजली इमारतीला भीषण आग! २३ व्या मजल्यावर आगीचा भडका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire News: घाटकोपरमध्ये उंच इमारतीला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Ghatkopar Fire: मुंबईतील २५ मजली इमारतीला भीषण आग! २३ व्या मजल्यावर आगीचा भडका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
Ghatkopar Fire
| Updated on: Nov 06, 2026 | 11:01 PM

मुंबईत इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थाचे प्रयत्न केले जात आहेत. घाटकोपर पूर्वेकडील कुकरेजा पॅलेस या 25 मजली निवासी इमारतीच्या २३ व्या मजल्यावर शुक्रवारी संध्याकाळी आग लागली आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी 7:56 च्या सुमारास आगीचा कॉल आला. अग्निशमन दलाचे जवान रात्री 8:15 वाजता घटनास्थळी पोहोचले आणि रात्री 8:30 वाजता लेव्हल 1 ची आग जाहीर करण्यात आली. ही इमारत घाटकोपर पूर्वेकडील पंत नगर भागातील वल्लभ बाग लेनवर आहे. रुग्णवाहिकेसह अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि आपत्कालीन वाहने घटनास्थळी तातडीने पाठवण्यात आली.

Loading...

घटनास्थळावरील एका व्हिडिओमध्ये इमारतीच्या वरच्या मजल्यांचा एक भाग प्रचंड आगीच्या ज्वाळांनी वेढलेला दिसत आहे. रात्रीच्या आकाशात काळ्या धुराचे लोट पसरत आहेत. या दृश्यांमध्ये अनेक खिडक्यांमधून आग बाहेर पडताना दिसत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ग्निशमन दलाचे जवान, मुंबई पोलीस, अदानी, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.

अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, आग सध्या नियंत्रणात आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेबाबत आमदार पराग शाह म्हणाले की, मजुरांना आगीची थोडी झळ बसली आहे. पण आता आग आटोक्यात आली आहे. प्रत्येक बिल्डींगची फायर फायटींग मजुबत असली पाहिजे. आजची आग फटाक्यांमुळे नाही लागली. पण फटाके वाजवतांना सर्वांनी जागरुक असले पाहिजे, असं त्यांनी सांगितलं आहे.

महापौर रितू तावडे म्हणाल्या की, आग लागल्याची ही घटना दुर्दैवी आहे. जेव्हा आग लागली तेव्हा घरात आई आणि मुलगा सोबतच काही कामगार होते. सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही. मात्र अग्निशमन दलाची टीम आग विझविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्वांना विनंती आहे की पटाक्यांबाबत सावधगिरी बाळगा. दिवाळीचा सण आहे. घरात जर लायटिंग किंवा इतर काम होत असेल तर घराचा एक माणूस तिथे बघण्यासाठी असला पाहिजे. लोकांनी सावध राहणे हे अत्यंत गरजेचं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us