
मुंबईच्या परळ येथे राहणाऱ्या पराग सावंत यांनी यंदा गणपतीसाठी साकारलेला देखावा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. या देखाव्यातून पराग सावंत यांनी जुनं लालबाग-परळ अर्थात गिरणगाव साकारले आहे. गेल्यावर्षी त्यांनी BBD चाळीचा देखावा साकारला होता. हा देखावा तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता. (छाया सौजन्य: पराग सावंत)

यंदाचा देखावाही त्याच तोडीचा आहे. यामध्ये परळ-लालबागची ओळख असलेली युनायटेड मिल, भारतमाता टॉकीज पाहायला मिळत आहेत. (छाया सौजन्य: पराग सावंत)

देखाव्यातील युनायटेड मिल आणि भारत माता टॉकीजची प्रतिमा इतकी हुबेहुब साकारण्यात आली आहे की, हा देखावा पाहून थक्क व्हायला होते. (छाया सौजन्य: पराग सावंत)

मुंबईत पहिली गिरणी सुरू झाली आणि महाराष्ट्रसह देशातील विविध भागातून लोकं आली सोबत आपली संस्कृती ,आपली भाषा , आपली परंपरा देखील घेऊन आले त्यातुनच या गिरणगावातील हा गणेशोत्सव जगाच्या पाठीवर आपली छाप सोडून आहे ,ईथल्या चाळसंस्कृतीत दडलेला गणेशोत्सव फार विशेष आहे. (छाया सौजन्य: पराग सावंत)

मुंबईतील पराग सावंत यांनी गणेशोत्सवासाठी साकारलेला अप्रतिम देखावा. (छाया सौजन्य: पराग सावंत)

गिरणगावचा देखावा