Mumbai Ganeshotsav | दादर, माहिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी, विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेकडे सोपवण्याच्या सूचना

| Updated on: Aug 19, 2020 | 6:09 PM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादर, माहिम चौपाटीवर भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

Mumbai Ganeshotsav | दादर, माहिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी, विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेकडे सोपवण्याच्या सूचना
Follow us on

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादर, माहिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे (Mumbai Ganesha Visarjan). तसेच, विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेकडे सोपवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत (Mumbai Ganesha Visarjan).

गिरगाव चौपाटीपाठोपाठ तुलनेत लहान असलेल्या दादर आणि माहिमच्या चौपाट्यांवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांना विसर्जनासाठी प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लगतच्या रस्त्यांवर लोखंडी मार्ग रोधक उभारुन चौपाटीवर जाणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत.

परिणामी भाविकांना घरी, सोसायटीच्या आवारात अथवा जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करावे लागेल. समुद्रावर येणाऱ्या भाविकांना विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे (Mumbai Ganesha Visarjan).

हेही वाचा : Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींचे संकलन, थेट विसर्जनास ‘नो एन्ट्री’, मुंबई पालिकेकडून नियमावली जारी

गिरगावप्रमाणेच दादर, माहिम चौपाटीवरही दरवर्षी गणेश विसर्जनानिमित्ताने भाविकांची गर्दी होते. गेल्या वर्षी येथे सुमारे 20 हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते. दरवर्षी दादर आणि माहिम चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येते. यंदा मात्र भाविकांना तेथे प्रवेश मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी चौपाटीवर जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी मार्गरोधक उभारण्यात येणार आहे.

चौपाटीवर येणाऱ्या भाविकांना गणेशमूर्ती पालिकेच्या ताब्यात देऊन परतावे लागणार आहे. पालिकेमार्फत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Mumbai Ganesha Visarjan

संबंधित बातम्या :

Ganeshotsav 2020 | नवी मुंबईत गणेश मूर्तींची होम डिलीव्हरी, गर्दी टाळण्यासाठी मूर्तीकारांची शक्कल

पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदानाचीही व्यवस्था