पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदानाचीही व्यवस्था

घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीचे करावे, असं आवाहन मोहोळ यांनी केलं होतं. (Pune Mobile Ponds for Ganesh Visarjan)

पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदानाचीही व्यवस्था

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद तयार करण्यात येणार आहे. तसेच मूर्तीदान करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयानिहाय व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दरम्यान यापूर्वीच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीचे करावे, असं आवाहन मोहोळ यांनी केलं होतं. (Pune Mobile Ponds for Ganesh Visarjan)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावे. तसेच नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्यासाठी प्राधान्य द्यावे. असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

मात्र ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे. त्या नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एका फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय मूर्ती लवकर विरघळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीनाचं प्राधान्य द्यावे.

तसेच घरीच’ श्रीं’ चे विसर्जन करण्यासाठी मनपाकडून सोडीयम बायकार्बोनेट मोफत पुरविण्यात येणार आहे. मूर्ती विक्रेते, प्रभागातील आरोग्य कोठ्या आणि क्षेत्रीय कार्यालयाचे ठिकाणी सोडीयम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिस अथवा शाडू मातीच्या मूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. अनंत चर्तुदशीला विसर्जन करून परत देव्हाऱ्यात ठेवता येऊ शकते. तसेच ज्या नागरिकांना मूर्तीचे दान करायचे असेल त्यांच्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.

‘गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी पुणे शहरात जवळपास पाच लाख ‘मूर्तीचे विसर्जन होते. जवळपास 20 ते 25 लाख गणेशभक्त या दिवशी रस्त्यावर उतरतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा पध्दतीने एकत्र येणे हे मोठ्या संकटाला आमंत्रण देणे ठरेल, असेही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. (Pune Mobile Ponds for Ganesh Visarjan)

संबंधित बातम्या : 

“घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे”, पुणे महापौरांचे आवाहन

पदपथावर गणेश मूर्तीचे स्टॉल नको, पुणे महापौरांचा कारवाईचा इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *