मुंबईत गॅस गळती नाही, स्थानिकांच्या तक्रारीवर अग्निशमन दलाचे स्पष्टीकरण, परिस्थिती पूर्ववत

| Updated on: Jun 07, 2020 | 11:34 AM

मुंबईत गॅस गळती झालेली नाही असे स्पष्टीकरण अग्निशमन दलाने दिले आहे. तसेच परिस्थिती पूर्ववत असल्याचंही सांगितलं (Mumbai gas leakage Issue) जात आहे. 

मुंबईत गॅस गळती नाही, स्थानिकांच्या तक्रारीवर अग्निशमन दलाचे स्पष्टीकरण, परिस्थिती पूर्ववत
Follow us on

मुंबई : मुंबईतील काही भागात रात्री मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे दाखल (Mumbai gas leakage Issue) झाल्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. मुंबईतील चेंबूर, गोवंडी, भांडूप, पवई, विक्रोळी, घाटकोपर या भागातून रात्री गॅस गळतीच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागात प्राप्त झाल्या. या तक्रारीनंतर अग्निशमन दलाच्या 13 गाड्या दाखल झाल्या. मात्र मुंबईत गॅस गळती झालेली नाही असे स्पष्टीकरण अग्निशमन दलाने दिले आहे. तसेच परिस्थिती पूर्ववत असल्याचंही सांगितलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी परिसरातील फार्मास्युटिकल कंपनीतून गॅस गळती झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यानंतर अग्निशमन दलाकडून या कंपनीच्या आवारात शोध घेण्यात आला. मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही.

या कंपनीतून अशाच प्रकारे गॅस गळतीचा दुर्गंध येत असल्याची तक्रार स्थानिक लोक करत आहेत. या कंपनीजवळील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने या कंपनीविरोधात यापूर्वी अनेक तक्रारीही दाखल केल्या आहेत.

नेमकं प्रकरणं काय?

मुंबईतील चेंबूर, गोवंडी, भांडूप, पवई, विक्रोळी, घाटकोपर या भागातून रात्री 12 च्या सुमारास गॅस गळतीच्या अनेक तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या. यानंतर अग्निशमन दल, आपत्कालीन विभाग, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या सर्व पथकांनी रात्रभर विविध ठिकाणी नेमकी गळती कुठून होत आहे याचा शोध घेतला.

त्यासोबतच दक्षता म्हणून प्रशासनाने संबंधित ठिकाणी जाऊन घाबरु नका असे आवाहन केले. खबरदारीचा उपाय म्हणून परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी अग्निशमन दलाकडून १३ संयंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

जर कोणालाही या वासामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास कृपया ओला रुमाल किंवा कपडा नाकाभोवती गुंडाळावा, असेही आवाहन पालिकेने केले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन नागरिकांनी घाबरु नका असे आवाहन केले (Mumbai gas leakage Issue)  होते.

संबंधित बातम्या : 

मुंबई-पुण्यात वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण सुरु, पुण्यातील सोसायट्यांमध्ये विक्रेत्यांना विरोध

राज्यातील उद्योग चक्र फिरले, 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू : सुभाष देसाई