मुंबई-पुण्यात वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण सुरु, पुण्यातील सोसायट्यांमध्ये विक्रेत्यांना विरोध

मुंबई-पुण्यात वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण सुरु, पुण्यातील सोसायट्यांमध्ये विक्रेत्यांना विरोध

राज्य सरकारने आजपासून घरोघरी वृत्तपत्रांची विक्री करण्यास परवानगी दिली (Mumbai Pune NewsPaper Door to door Distribution) आहे.

Namrata Patil

|

Jun 07, 2020 | 11:02 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मिशन बिगीन अगेन‘ला सुरुवात झाली (Mumbai Pune NewsPaper Door to door Distribution) आहे. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी आजपासून वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरण सुरु झाले आहे. मुंबईत पहाटे साडेतीनपासून अनेक ठिकाणी वृत्तपत्र वेगवेगळे करण्यास सुरुवात झाली. तर पुण्यात मात्र काही सोसायट्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना विरोध केला आहे.

राज्य सरकारने आजपासून घरोघरी वृत्तपत्रांची विक्री करण्यास परवानगी दिली आहे. काही नियम आणि अटी-शर्तींवर ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वाचकांना घरातच पेपर वाचायला मिळणार आहे.

मुंबईतील काही ठिकाणी आजपासून वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणाला सुरुवात करण्यात आली आहे. दादर पश्चिमकडील अनेक ठिकाणी पहाटेपासून वृत्तपत्रांची विभागणी केली जात होती. हे पेपर शहरातील विविध परिसरात विक्रीसाठी नेण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेने मिशन बिगेन अगेनला सुरुवात केली आहे. याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईसह इतरही ठिकाणी लवकरच वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणाला सुरुवात होईल, असा विश्वास वृत्तपत्र विक्री करणारे राजेश पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात वृत्तपत्र वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यात 11 मेपासून ग्रीन झोनमधील काही ठिकाणी स्टॉल आणि घरोघरी वृत्तपत्र विक्री सुरू आहे. मात्र इतर भागात वृत्तपत्र विक्री ठप्प होती. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर इतर भागातही घरोघरी वृत्तपत्र विक्री सुरू झाली आहे. मात्र अनेक सोसाट्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी वृत्तपत्र विक्रेत्यांना विरोध होताना दिसत (Mumbai Pune NewsPaper Door to door Distribution) आहे.

संबंधित बातम्या : 

राज्यात ‘पुनश्च हरिओम’, पहिला-दुसरा टप्पा आजपासून, काय सुरु काय बंद?

पुण्यात सध्या कोरोनाचे किती रुग्ण? विभागीय आयुक्त म्हणतात…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें