AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येवा ‘टोल’ आपलोच असा! मुंबई-गोवा हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांनो, कोकणातील दोन्ही टोल उद्यापासून सुरु

Mumbai Goa Highway Toll Update : अनेक राजकीय पक्षांनी या टोलनाक्याला विरोध केला होता. एवढ्यात टोल सुरु करु नका, असं अनेकांनी म्हटलं होतं. टोल सुरु केला, तर आंदोलन करु असा इशाराही देण्यात आला होता.

येवा 'टोल' आपलोच असा! मुंबई-गोवा हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांनो, कोकणातील दोन्ही टोल उद्यापासून सुरु
अखेर टोलची सुरुवात..Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 9:34 AM
Share

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Mumbai Goa Highway Toll) विवादीत ओसरगाव टोलनाका (Osargaon Toll) अखेर उद्यापासून (1 जून) पासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना या मार्गावरुन प्रवास करताना पैसे मोजावे लागणार आहेत. अनेक राजकीय पक्षांनी या टोलनाक्याला विरोध केला होता. एवढ्यात टोल सुरु करु नका, असं अनेकांनी म्हटलं होतं. टोल सुरु केला, तर आंदोलन करु असा इशाराही देण्यात आला होता. अखेर उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोलनाका सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सगळी तयारीदेखील पूर्ण झाली आहे. या टोल वसुलीचं कंत्राट एमटी करीमुनिसा कंपनीकडे देण्यात आलंय. ओसरगावसोबत राजापूर-हातीवले (Rajapur Toll) मधील टोलही उद्यापासून सुरु होणार आहे.

चौपदरीकरणामुळे वेगवान प्रवास

मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. या महामार्गावरील बहुतांश काम पूर्ण झालं असून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओसरगाव हा टोल कधी सुरु होणार, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलं होतं. तूर्तास टोल सुरु करु नये यावरुन राजकारणंही तापलेलं. दरम्यान, उद्पासून ओसरगावचा टोलनाका सुरु करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान हा टोलनाका सुरु होत असल्यानं वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.

का आहे नाराजी?

टोल सुरु केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना भुर्दंड बसेल, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान. टोल नाक्यापासून वीस किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक 315 रुपयांचा पास देण्यात येणार आहे. तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे.

बाईक, स्कूटी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील रिक्षा चालकांना या टोल वसुलीतून दिलासा मिळालाय. दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागेल.

थोडक्यात पण महत्त्वाचं

  1. टोलपासून 20 किमीच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक पास
  2. 315 रुपयांत महिनाभर आसपासच्या वाहनांचा प्रवास करता येणार
  3. बाईकला आणि रिक्षाला टोलमधून सूट
  4. मोठ्या प्रमाणात रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांना टोलवसुलीतून दिलासा
  5. मुंबई-गोवा महामार्गानं प्रवास करणाऱ्यांना टोलवसुलीचा फटका बसणार
  6. गोव्याहून सिंधुदुर्गात नियमित ये-जा करणाऱ्यांना टोलवसुलीमुळे पैसे मोजावे लागणार

असा असेल टोलचा दर

जीप, व्हॅन, कार – सिंगल जर्नी 90 रुपये रिर्टन जर्नी टोल घेतल्यास 135 रुपये दर

हलकी व्यावसायिक वाहनं, मोठी मालवाहू वाहनं आणि मिनीबससाठी 135 रुपये रिटर्न जर्नीसाठी 220 रुपये

ट्रक आणि बससाठी (डबल अँक्सल) – 305 रुपये रिटर्न जर्नीसाठी 460 रुपये

ट्रक आणि बस (ट्रिपल अँक्सल) – 335 रुपये रिटर्न जर्नीसाठी – 500 रुपये

MH 07 पासिंग वाहनांसाठी 45 रुपये टोल MH 07 पासिंग मिनीबससाठी 75 रुपये MH 07 पासिंग ट्रक-बससाठी 115 रुपये

टोलवसुलीची घाई का?

दरम्यान, मुंबई गोवा महमार्गाचं संपूर्ण काम अजूनही पूर्णत्वास आलेलं नाही. काही भागात अजूनही काम सुरु आहे. अशावेळी टोल सुरु करण्याची घाई का केली जाते आहे, असा सवाल उपस्थित केला जातोय. रंगीत तालीम म्हणून 26 मे रोजी ओसरगावचा टोलनाका अचानक सुरू करण्यात आला होता. अखेर वाढचा विरोध पाहून संध्याकाळी टोलची रंगीत तालिम थांबवावी लागली होती. 27 मे पासून खरंतर टोल सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र आता 1 जून पासून कोकणातील दोन्ही टोल पूर्ण क्षमतेनं सुरु केले जाणार असल्याचं स्पष्ट आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.