लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक, वेळापत्रक कसं असणार?

मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावर ३ दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर झाला आहे. वाशी स्थानकातील सिग्नल प्रणालीच्या कामासाठी हा ब्लॉक रात्री १०:४५ ते पहाटे ३:४५ पर्यंत राहील. यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द किंवा अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींच्या मार्गांत बदल करण्यात आले आहेत.

लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक, वेळापत्रक कसं असणार?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Aug 06, 2025 | 9:21 AM

मुंबईची लाईफलाईन असलेल्या हार्बर रेल्वे मार्गावर तीन दिवस मेगाब्लॉक घेणार आहे. हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजेच सिग्नल नियंत्रण प्रणालीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. येत्या बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन रात्रीसाठी रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ पर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या वाशी आणि पनवेलदरम्यान प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकनिमित्त अनेक लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच काही लोकल गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच काही लोकल सेवा रद्द किंवा अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

कसं असणार लोकलचं वेळापत्रक?

  • बेलापूरहून रात्री ८:५४ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल वाशीपर्यंतच धावेल.
  • बेलापूरहून रात्री ९:१६ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल वडाळा रोडपर्यंतच धावेल.
  • वांद्रेहून रात्री १०:०० वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल वडाळा रोडपर्यंतच धावेल.
  • पनवेलहून रात्री १०:५० आणि ११:३२ वाजता सुटणाऱ्या वाशी लोकल नेरूळपर्यंतच धावतील.
  • वाशीहून पहाटे ४:०३, ४:१५, ४:२५, ४:३७, ४:५० आणि ५:०४ वाजता सुटणाऱ्या अप दिशेच्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
  • तसेच सीएसएमटीहून रात्री ९:५०, १०:१४ आणि १०:३० वाजता वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

या लोकल नेहमीच्या स्थानकाऐवजी इतर स्थानकांतून सुटतील

  • वडाळा रोड-पनवेल लोकल (गुरुवारी पहाटे): पहाटे ५:०६ आणि ५:५२ च्या लोकल वडाळा रोडऐवजी नेरुळहून सुटतील. त्यामुळे वडाळा रोड ते नेरूळदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
  • सीएसएमटी-पनवेल लोकल (गुरुवारी पहाटे): पहाटे ४:५२ आणि ५:३० च्या लोकल सीएसएमटीऐवजी नेरुळहून सुटतील. त्यामुळे सीएसएमटी ते नेरूळदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
  • सीएसएमटी-गोरेगाव लोकल (गुरुवारी पहाटे): पहाटे ५:१० ची लोकल सीएसएमटीऐवजी वडाळा रोडहून सुटेल. त्यामुळे सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे. या काळात प्रवास टाळण्याचा प्रयत्न करणे योग्य राहील. कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा विचार करावा किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या वेळापत्रकाची पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी.