मुंबईत उष्णतेची लाट, वाढत्या उन्हाचा माशे विक्रेत्यांना फटका; शासनाकडे मदतीची मागणी

| Updated on: Apr 12, 2022 | 1:25 PM

मुंबईसह (Mumbai) राज्यात उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे, अचानक आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा जसा भाजीपाल्याला फटका बसला आहे, तेवढाच फटका हा मासेमारीला (Fishing) देखील बसला आहे.

मुंबईत उष्णतेची लाट, वाढत्या उन्हाचा माशे विक्रेत्यांना फटका; शासनाकडे मदतीची मागणी
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : मुंबईसह (Mumbai) राज्यात उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे, अचानक आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा जसा भाजीपाल्याला फटका बसला आहे, तेवढाच फटका हा मासेमारीला (Fishing) देखील बसला आहे. बाजारातील आवक घटली आहे. बाजारातील माशांची आवक घटल्याने भाव वाढले आहेत. मात्र दुसरीकडे उष्णतेच्या कडाक्यामुळे ग्राहक मार्केटकडे फिरकत नसल्याने मश्चिमार हवालदिल झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून मुंबई परिसरात उष्णतेची लाट आहे. गेल्या सात वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद यावर्षी मार्च महिन्यात झाली आहे. उष्णता वाढल्याने त्याचा परिणाम हा माशांच्या विक्रीवर होत आहे, ग्राहक बाजाराकडे फिरकत नसल्याने आता करायचे काय असा प्रश्न माशेविक्रित्यांना पडला आहे. दरम्यान अशा परिस्थितीमध्ये शासनाने आम्हाला काही मदत करावी अशी मागणी देखील विक्रेत्यांनी केली आहे.

माशांचे दर हजारांच्या घरात

गेल्या दोन आठवड्यात माशांच्या सर्वच जातींचे दर वाढले आहेत. काही माशांचे भाव तर प्रति किलो दीड हजारांपर्यंत पोहोचले आहेत. एवढे दराने कोण मासे खरेदी करणार? तसेच उष्णतेमुळे ग्राहक देखील बाजारपेठेकडे फीरकत नाहीत, त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत असल्याचे माशे विक्रेत्या महिलांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे वादळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सरकार मच्छिमार आणि शेतकऱ्यांना मदत करते त्याचप्रमाणे आता उष्णतेमुळे आमचे नुकसान होत असून, आम्हाला देखील मदत करावी अशी मागणी आता मच्छिमारांकडून होत आहे.

भाजीपाल्याच्या भावात वाढ

सध्या राज्यात उष्णतेची लाट आहे, उष्णतेच्या लाटेचा फटका हा केवळ मच्छिमारांनाच नाही तर भाजीपाल्याला देखील बसला आहे, उष्णतेमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे, भाजीपाल्याची आवक घटल्याने दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. लिंबू, बटाटा आणि इतर फळवर्गीय तसेच पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. भाजी पाल्याचे दर वाढल्याने सर्व सामान्यांचे किटन बजेट कोलमडले आहे.

संबंधित बातम्या

Mahayuva App : ‘महायुवा ॲप’ ची अनोखी संकल्पना ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची आखणी, तरुणांना मिळणार स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण, इथे करा नोंदणी

Dilip Walse Patil: तुमची सेक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत हे केंद्राला विचारणार; दिलीप वळसे पाटील यांचं मोठं विधान

मुंबईकरांना मोठा दिलासा! एक मेपासून आता प्रत्येक घरात पाणी