मुंबईकरांना मोठा दिलासा! एक मेपासून आता प्रत्येक घरात पाणी

मुंबईकरांसाठी (Mumbaikar) आनंदाची बातमी आहे, एक मेपासून आता मुंबईतील प्रत्येक घरात पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक घराला मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीने नळाचे कनेक्शन मिळणार आहे.

मुंबईकरांना मोठा दिलासा! एक मेपासून आता प्रत्येक घरात पाणी
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी गड राखणार की भाजप बाजी मारणार
Image Credit source: curly tales
अजय देशपांडे

|

Apr 12, 2022 | 11:40 AM

मुंबईकरांसाठी (Mumbaikar) आनंदाची बातमी आहे, एक मेपासून आता मुंबईतील प्रत्येक घरात पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक घराला मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीने नळाचे कनेक्शन मिळणार आहे. यामुळे पाणीचोरी आणि बेकायदा पाण्याचे कनेक्शन (Illegal water connection) घेण्याचे प्रकार बंद होतील अशी अशा बीएमसी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. महापालिकेच्या ‘वॉटर फॉर ऑल’ या महत्त्वकांक्षी उपक्रमाची घोषणा सोमवारी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. पालिकेच्या या धोरणानुसार फुटपाथ, रस्ते आणि इत प्राधिकरणांसह सर्वच झोपडीधारकांना पालिकेकडून पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेक.दरम्यान मुंबईतील निवासी इमारतीमधील 1964 नंतर झालेली अनधिकृत बांधकामे ‘झोपडी नसलेल्या व मोडकळीस आलेल्या इमारती’ वगळून इतर सर्व घरांना नळजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्ण निवासी इमराती किंवा त्याचा काही भाग ज्यांचे नकाशे संबंधित विभागाने मंजूर केले नाहीत अशा इमरतींना देखील आता पणी मिळणार आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्टे

फूटपाथ व रस्त्यावरील झोपडपट्टीधारकांना उभ्या नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. हे नळ सार्वजनिक असतील. साखगी जमिनीवरील अघोषीत झोपडपट्टीधारकांकडून हमीपत्र घेऊन त्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सीआरझेड व समुद्र किनाऱ्यावरील झोपडपट्टीधारकांना देखील फूटपाथ व रस्त्यावरील झोपडपट्टीधारकांप्रमाणेच उभ्या सार्वजनिक नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

योजनेमुळे होणारे फायदे

मुंबई महापालिकेकडून आता मुंबईतील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पाणी चोरी आणि अनधिकृत नळ कनेक्शन या सारखे प्रकार थांबणार आहेत. अनधिकृत कनेक्शन कमी झाल्यास महापालिकेचा त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न देखील वाढेल. सोबतच घरात पाणी मिळाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळाल्याने अशुद्ध पाण्यामुळे निर्माण होणारे अनेक आरोग्याचे प्रश्न देखील कमी होतील. झोपडपट्टीधारकांना सार्वजनिक नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर बातम्या

Raut on Somaiya: इथे धमकी द्यायची, थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे; राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप

Kirit Somaiya: अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नॉट रिचेबल सोमय्यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाले…

Sanjay Raut : सोमय्या 140 कोटी जमा करून राजभवनात देणार होते, 58 कोटीच जमवता आले, संजय राऊतांचा सोमय्यांना चिमटा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें