Mahayuva App : ‘महायुवा ॲप’ ची अनोखी संकल्पना ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची आखणी, तरुणांना मिळणार स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण, इथे करा नोंदणी

या महायुवा ॲप बरोबरच शिवसेनेकडून स्वयंरोजगार शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलंय. व्यावसायिक होण्याची इच्छा असणारे, महिला बचत गट आणि व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Mahayuva App : 'महायुवा ॲप' ची अनोखी संकल्पना ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची आखणी, तरुणांना मिळणार स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण, इथे करा नोंदणी
'महायुवा ॲप' ची अनोखी संकल्पना !
Image Credit source: Twitter
रचना भोंडवे

|

Apr 12, 2022 | 12:35 PM

मुंबई : व्यवसाय (Business) आणि उद्योग क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या स्वयंरोजगाराच्या, रोजगाराच्या (Employment) संधी याबद्द्लची माहिती तरुणांना मिळावी यासाठी एक नवी संकल्पना राबविली जाणार आहे. या संकल्पनेतून ‘महायुवा ॲप’ (Mahayuva App) लाँच करण्यात आलंय. राज्यातील तरुणांना रोजगाराची माहिती उपलब्ध व्हावी, त्यांच्या उद्योजगतेला चालना मिळावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची आखणी करण्यात आलीये. याचसाठी हे ॲप तयार करण्यात आलंय. नुकतंच या ॲपचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव सुरज चव्हाण, आमदार विलास पोतनीस, सिनेट सदस्य मिलिंद साटम, CII MCC चे दयाल कांगणे, सेक्युअर क्रेडेन्टिशियल्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक राहुल बेलवलकर यांनी या महा युवा ॲपची संकल्पना प्रत्यक्षात आणलीये.

या महायुवा ॲपबरोबरच शिवसेनेकडून स्वयंरोजगार शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलंय. व्यावसायिक होण्याची इच्छा असणारे, महिला बचत गट आणि व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. गुरुवारी १४ एप्रिल २०२२ रोजी शिवसेना विभाग क्रमांक १ तर्फे या स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठीची नोंदणी आणि कार्यक्रमाचं ठिकाण याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. नवीन उद्योग, महिला बचत गट, लघु उद्योग यांना चालना देण्यासाठी आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी कशी कराल ?

सहभागी होण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करा – www.medahedayuveda.comed

किंवा

या मोबाईल नंबरवर संपर्क करा – 8767510941

नोंदणीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत ?

  1. आधार कार्ड झेरॉक्स
  2. पॅन कार्ड झेरॉक्स
  3. राशन कार्ड झेरॉक्स
  4. उद्योग आधार (असल्यास)
  5. प्रोजेक्ट रिपोर्ट ( तयार असल्यास )
  6. शेवटची शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका
  7. कौशल्य प्रमाणपत्र (असल्यास)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन हवं असल्यास १३ एप्रिल पर्यंत ‘इथे’ संपर्क साधा

शाखा क्र १०, चंदावरकर लेन बोरिवली (प.) शाखा क्र ९, पेप्सी गार्डनजवळ, गोराई- २, बोरिवली (प.) आमदार प्रकाश सुर्वे यांचं कार्यालय, अशोकवन, दहिसर (पू.)

इतर बातम्या :

Jharkhand : झारखंडमधील रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांची तासाभरात सुटका, हेलिकॉप्टरमधून एक तरूण पडला

Viral Video : स्वच्छ आकाश… निळशार पाणी, लडाखच्या पॅंगाँग तलावात तीन तरूणांचे ‘तीर’, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

Gunratna Sadavarte: सदावर्तेंनी पैसे घेतल्याचा संजय मुंडेंचा दावा, पहिल्या टप्प्यात 1 लाख 10 हजार रुपये दिल्याची माहिती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें