AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Helmet News: मुंबईत आजपासून हेल्मेटसक्ती! दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्यासही हेल्मेट बंधनकारक

Mumbai Helmet Fine : 6 एप्रिलपासूनच मुंबई हेल्मेटसक्तीच्या नियमाची कठोर अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली होती.

Mumbai Helmet News: मुंबईत आजपासून हेल्मेटसक्ती! दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्यासही हेल्मेट बंधनकारक
हेल्मेटबाबत महत्त्वाची बातमी...Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 08, 2022 | 6:29 AM
Share

मुंबई : मुंबईतील हेल्मेटसक्ती (Mumbai Helmet News) आज (8 जून) पासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना बुधवारपासून हेल्मेट वापरणं बंधनकारक असणार आहे. फक्त दुचाकी चालवणाराच नव्हे, तर त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक करण्यात आलंय. अन्यथा यापुढे कारवाई केली जाणार आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुंबईतील हेल्मेटसक्तीचा निर्णय आधीच जाहीर केला होता. आजपासून त्याची अंमलबजावीण काटेकोरपणे केली जाणार आहे. पोलियन रायडरने हेल्मेट घातलेलं नसेल तर त्याचा फटका दुचाकीस्वाराला बसणार आहे. सोबत वाहन चालकाचं लायसन्सही तीन महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात येईल. 25 मे रोजी एक पत्रक काढत मुंबईमध्ये हेल्मेटसक्ती करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. हेल्मेटसक्तीचं उल्लंघन जे करतील त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशाराही मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिलाय. आता मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून बुधवारपासून हेल्मेटसक्तीच्या अनुशंगाने कारवाईला वेग येणार आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचं…

  1. हेल्मेट न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड
  2. तीन महिन्यांसाठी गाडी चालवण्याचा परवानाही रद्द होई
  3. बाईकस्वारासह मागे बसणाऱ्यासही हेल्मेट बंधनकारक

25 मे रोजी काढण्यात आलेल्या पत्रात काय म्हटलं होतं?

मुंबई वाहतूक पोलीस विभागानं 25 मे रोजी एक आदेश काढला होता. या आदेशानुसार, मुंबईमध्ये दुचाकीवरून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत, त्यांनी हेल्मेट बंधनकारक असेल. यामध्ये चालकासह म्हणजे बाईक रायडरसह मागे बसणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच पिलिय रायडरला देखील हेल्मेट वापरणं बंधनकारक असणार आहे.

पुढच्या पंधरा दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असं 25 मे रोजी काढण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं होतं. जे हेल्मेटसक्तीच्या नियमाचं उल्लंघन करतील, त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणारे. त्यामुळे आता मुंबईकरांना हेल्मेट घालूनच घराबाहेर पडावे लागणारंय.

आतापर्यंत किती जणांवर कारवाई?

6 एप्रिलपासूनच मुंबई हेल्मेटसक्तीच्या नियमाची कठोर अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली होती. एका विशेष मोहिमेच्या अंतर्गत हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्या 2 हजार 446 जणांचं लायसन्स सस्पेंड करण्याचा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवला होता. तर पोलिसांनी 1 हजार 947 दुचाकीस्वारांना हेल्मेट का घातलं पाहिजे, याचं महत्त्वही पटवून दिलंय.

वाहतूक पोलिसांच्या मोहिमेअंतर्गत राँग वेनं म्हणजेच चुकीच्या दिशेनं वाहन चालवणार्या दोन हजारहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या. तर दोनशे वाहनचालकांवर उगागच हॉर्न वाजवल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला. एकूण एक हजार रुपये विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांकडून वसूल करण्यात आला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.