लालबागच्या राजाला भरभरुन दान! दानपेटीत 8 कोटी जमा होणार? गुरुवारपर्यंत तब्बल इतक्या कोटींची देणगीत भर

| Updated on: Sep 09, 2022 | 11:53 AM

आता एकूण जमा देणगी किती आहे, याबाबत रविवारी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यात गुरुवार आणि शुक्रवारी आलेल्या देणगीची रक्कमही मोजली जाईल. विसर्जनानंतर याबाबतची आकडेवारी नोंदवली जाईल आणि त्यानंतर त्याची माहिती सगळ्यांना दिली जाईल

लालबागच्या राजाला भरभरुन दान! दानपेटीत 8 कोटी जमा होणार? गुरुवारपर्यंत तब्बल इतक्या कोटींची देणगीत भर
लालबागचा राजा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मुंबईतील (Mumbai Ganpati Festival) प्रसिद्ध लालबागचा राजा (Lalbaug cha Raja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला बुधवारपर्यंत साडेसहा कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची देणगी प्राप्त झाली आहे. आता गुरुवारी नेमकी किती देणगी मिळाली, हे विसर्जनानंतर (Ganpati Visarjan) मोजलं जाईल. मंगळवारपर्यंत लालबागचा राजा मंडळाला 5.1 कोटी रुपयांची देणगी मिळालेली होती. बुधवारी यात दीड कोटी पेक्षाही जास्तीची भर पडली.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,  मंडळाचे पदाधिकारी मंगेश दळवी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. मंगेश दळवी यांनी म्हटलयं की, रोख देणगीमध्ये वाढ झाली आहे. तब्बल 4.04 कोटी रुपयांची रोख रक्कम देणगीच्या स्वरुपात बुधवारपर्यंत प्राप्त झाली आहे. मंगळवारी देणगीची हीच आकडेवारी 3.35 कोटी रुपयांपर्यंत होती. दरम्यान, आतापर्यंत 2.44 कोटी रुपये किंमतीचे 4.64 किलो सोनं आणि 25.41 लाख रुपये किंमतीचे 46.2 किलो चांदीची देणगीही मिळाल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

बुधवारपर्यंत किती देणगी?

  • एकूण प्राप्त झालेली देणगी – 6.7 कोटी पेक्षा अधिक
  • एकूण रोख रक्कम – 4.04 कोटी रुपये
  • एकूण सोनं – 4.64 किलो, किंमत 2.44 कोटी रुपये
  • एकूण चांदी – 46.2 किलो, किंमत 25.41 लाख रुपये

8 कोटीपेक्षाही जास्त देणगी?

दरम्यान, आता एकूण जमा देणगी किती आहे, याबाबत रविवारी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यात गुरुवार आणि शुक्रवारी आलेल्या देणगीची रक्कमही मोजली जाईल. विसर्जनानंतर याबाबतची आकडेवारी नोंदवली जाईल आणि त्यानंतर त्याची माहिती सगळ्यांना दिली जाईल, असं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीचा विचार करता लालबागच्या राजाचरणी 8 कोटी किंवा त्यापेक्षाही जास्त दान जमा होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.

हे सुद्धा वाचा

पाहा LIVE घडामोडी : Video

महत्त्वाचं म्हणजे लालबागच्या राजाला मिळालेल्या देणगीतील सोन्याचे दागिने, मोदक, अंगठ्या आणि इतर वस्तूंचा लिलावही दरवर्षी केला जातो. मात्र इतर वर्षांप्रमाणे यंदा हा लिलाव होणार नाही. दरवर्षी तीन दिवस ही लिलावाची प्रक्रिया चालायची. मात्र यंदा एक दिवसच लिलावाची प्रक्रिया पार पडेल. 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता हा लिलाव पार पडेल. त्यात सोन्या चांदीच्या वस्तूंसह दान करण्यात आलेल्या समई, गणपतीची मूर्ती, इत्यागी वस्तूंचाही लिलावाचा समावेश असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.