AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकल सुटताच त्या दोघांनी छेड काढली, मग महिलांनी जे केलं ते…., मुंबईत धावत्या लोकलमध्ये नेमकं काय घडलं? Video समोर

मुंबई आणि ठाणे परिसरातील लोकल ट्रेन व रेल्वे स्थानकांवर महिला प्रवाशांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धावत्या लोकलमध्ये अश्लील चाळे, तसेच ठाणे स्थानकावर विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल सुटताच त्या दोघांनी छेड काढली, मग महिलांनी जे केलं ते...., मुंबईत धावत्या लोकलमध्ये नेमकं काय घडलं? Video समोर
csmt
| Updated on: Dec 03, 2025 | 10:21 AM
Share

मुंबई आणि ठाणे परिसरातील रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबई लोकल आणि स्टेशन परिसरात विनयभंग, अश्लील चाळे याप्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातच आता सीएसएमटी-अंबरनाथ धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशासमोर दोन तरुणांनी अश्लील चाळे केल्याची माहिती समोर आली आहे.  रेल्वे स्थानकांवरील आणि लोकल ट्रेनमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनांमुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि गस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशासमोर अश्लील चाळे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंबरनाथ दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशासमोर दोन तरुणांनी अत्यंत संतापजनक कृत्य केले. तिची लोकल ट्रेन सीएसएमटीवरून सुटताच या दोन्ही आरोपींनी महिला प्रवाशाची छेड काढण्यास आणि तिच्यासमोर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हा धक्कादायक प्रकार पाहता महिलेने तातडीने आपल्या नातेवाईकांना फोन करून ही माहिती दिली. त्यांची ट्रेन उल्हासनगर रेल्वे स्थानकावर थांबल्यावर महिलेचे नातेवाईक आणि संतप्त झालेले अन्य सहप्रवासी यांनी या दोन्ही तरुणांना पकडले.

या संतापलेल्या जमावाने आरोपींना चांगलाच चोप देऊन त्यांना धडा शिकवला. यानंतर या दोन्ही आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या कल्याण जीआरपी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकावर २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग

ठाणे रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. कल्याणच्या दिशेकडील फलाट क्रमांक 3वरील ब्रिजवर चढत असलेल्या एका 21 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. गजबजलेल्या रेल्वे स्थानकात दिवसाढवळ्या घडलेल्या या लाजिरवाण्या प्रकारामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी (G.R.P.) तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी सुनील पारकर (वय ५८) या आरोपीला दिव्यातून अटक केली आहे. तसेच ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि महिलांच्या प्रवासावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

गोवंडी स्थानकावर छेडछाड करणाऱ्या तरुणाला घडवली अद्दल

त्यासोबत गोवंडी रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका बाकावर बसलेल्या तरुणीला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर बसलेला एक तरुण सतत तिच्याकडे एकटक पाहत होता. धक्कादायक बाब म्हणजे काही मिनिटांनी त्याने या तरुणीसमोर अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. तरुणीने सुरुवातीला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणाचे वर्तन अधिक विचित्र आणि घाणेरडे होऊ लागले. शेवटी, संताप अनावर झालेल्या तरुणीने मोठे धाडस दाखवत त्या तरुणाजवळ जाऊन त्याला जाब विचारला. ‘का बघतोयस? हे काय हावभाव करत होतास? असे विचारुन त्या तरुणीने त्याच्या कानशिलात लगावली.

दरम्यान या तिन्ही घटनांमुळे मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षित प्रवासावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकलच्या डब्यात आणि गजबजलेल्या रेल्वे स्थानकांवरही महिलांना छेडछाड, अश्लील हावभाव आणि विनयभंगाचे प्रसंग सामोरे जावे लागत आहेत. रेल्वे आणि लोहमार्ग पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...