AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवार मेगाब्लॉकचा, मुंबईकरांनो घराबाहेर पडताना लोकलचं वेळापत्रक आधी चेक करा

मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर येत्या रविवारी 7 एप्रिलला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उपनगरीय सेवेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

रविवार मेगाब्लॉकचा, मुंबईकरांनो घराबाहेर पडताना लोकलचं वेळापत्रक आधी चेक करा
मुंबई लोकल
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 05, 2024 | 11:10 PM
Share

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडणार असाल आणि लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर येत्या रविवारी 7 एप्रिलला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उपनगरीय सेवेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे. येत्या रविवारी माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव दरम्यान मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.

सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

डाउन धीमी लाइनवर:

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.५३ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३३ वाजता सुटेल.

अप धीमी लाइनवर:

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही आसनगाव लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी १०.२७ वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल असून ठाणे येथून दुपारी ०४.०३ वाजता सुटणार आहे.

ट्रान्स हार्बर मार्ग

सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्ग :

ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत सदर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर:

  • ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही पनवेल लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी १०.३५ वाजता सुटणार आहे.
  • ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी लोकल ठाणे येथून दुपारी ४.१९ वाजता सुटणार आहे.

अप ट्रान्स हार्बर मार्गावर:

  • ठाण्यासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून सकाळी १०.१५ वाजता सुटणार आहे.
  • ठाण्यासाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.५३ वाजता सुटणार आहे.

प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, पायाभूत सुविधांच्या या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...