Mumbai Mega Block : मुंबईच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! रेल्वे प्रवाशांनो, कृपया इथे लक्ष असू द्या, मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेचाही ब्लॉक

Mumbai Mega Block : मुंबईच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! रेल्वे प्रवाशांनो, कृपया इथे लक्ष असू द्या, मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेचाही ब्लॉक
मेगा ब्लॉक
Image Credit source: TV9

आज जर तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर नेमका कोणत्या मार्गावर मेगाब्लॉकचं कसं नियोजन असणार आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

| Edited By: सिद्धेश सावंत

May 29, 2022 | 6:09 AM

मुंबई : मुंबईकरांनो, आज रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई लोकलच्या (Mumbai Local News) वेळेत बदल करण्यात आला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक असेल. मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय. ब्लॉक (Mega Block Update) काळात रेल्वेच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे सकाळी साडे दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत देखभाल दुरुस्तीचं काम चालणार आहे. आज जर तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर नेमका कोणत्या मार्गावर मेगाब्लॉकचं कसं नियोजन असणार आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

तिन्ही लाईनवर मेगाब्लॉक

  1. पश्चिम मार्गावर जम्बोब्लॉक – पश्चिम मार्गावर शनिवारी रात्रीपासून ब्लॉकला सुरुवात करण्यात आली. बोरीवली ते कांदिवली स्थानकादरम्यान, अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ब्लॉक सुरु करण्यात आला. हा ब्लॉक रविवारी दुपारी दीड वाजता संपणार आहे. पश्चिम मार्गावर घेण्यात येणाऱ्या ब्लॉकदरम्यान सर्व गाड्या स्लो ट्रॅकवरुन चालवण्यात येणार आहेत.
  2. मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक – मध्य रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येतो आहे. सकाळी 10.55 मिनिटांनी हा ब्लॉक सुरु होईल. दुपारी 3.55 मिनिटांपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक काळात देखभाल दुरुस्तीचं काम चालणार आहे. मध्य रेल्वेच्या चत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या मार्गावर हे काम घेण्यात येणार आहे.
  3. हार्बर लाईनवर मेगाब्लॉक – हार्बर मार्गावरील ब्लॉक दरम्यान चुनाभट्टी आणि वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिस पर्यंतची लोकलसेवा पूर्णपणे बंद असेल. ब्लॉक काळात विशेष लोकल चालवल्या जाण्याची शक्यता आहे. सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत हार्बर लाईनच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे या मार्गावर देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरुन प्रवास करु इच्छिणाऱ्या प्रवाशांना मध्य आणि पश्चिम रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाचं ट्वीट

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

बहुतांश दर रविवारी मुंबईत रेल्वे प्रशासनाकडून लोकल मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. त्यानुसार मुंबईतील लोकल सेवेच्या वेळेत आणि वाहतुकीच बदलची केले जात असतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें