मुंबईत 443 अतिधोकादायक इमारती, ठोस पावलं उचलणे गरजेचे : महापौर किशोरी पेडणेकर

| Updated on: Jul 20, 2020 | 4:33 PM

मुंबईत सध्या महापालिका, म्हाडा, सरकारी आस्थापने यांच्या एकूण 443 इमारती अतिधोकादायक स्थितीत (Mumbai Mayor on dangerous buildings) आहेत.

मुंबईत 443 अतिधोकादायक इमारती, ठोस पावलं उचलणे गरजेचे : महापौर किशोरी पेडणेकर
Follow us on

मुंबई : फोर्ट भागातील सहा मजली भानुशाली बिल्डिंगचा भाग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तात्काळ बैठक बोलवली होती. या बैठकीत किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील धोकादायक इमारतीबाबतचा आढावा घेतला. या बैठकीला पालिकेसह म्हाडाचेही अधिकारी उपस्थिती होते. (Mumbai Mayor Kishori Pednekar Meeting on dangerous buildings)

“मुंबईत सध्या महापालिका, म्हाडा, सरकारी आस्थापने यांच्या एकूण 443 इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. या सर्व इमारतींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. या इमारती कोणाच्याही असो, त्याबाबत आता ठोस पावलं उचलली पाहिजेत. कोणीही जबाबदारी झटकून जमणार नाही,” असे आदेश या बैठकीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.

“मुंबईत सद्यस्थितीत पालिका 56, सरकारी 27, खासगी 360 अशा एकूण 443 इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. या इमारतींसाठी सर्वप्रथम काय करता येईल, हे पाहिलं जाईल. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे,” असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

“मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पुढील आठवड्यात पुन्हा एक बैठक घेतली जाईल,” असेही त्या यावेळी (Mumbai Mayor Kishori Pednekar Meeting on dangerous buildings) म्हणाल्या.

मुंबईतील अतिधोकादायक इमारती

  • पालिका – 56
  • सरकारी – 27
  • खासगी – 360
    एकूण – 443

भानुशाली इमारत दुर्घटना

मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली. धोकादायक असलेल्या या इमारतीचा 40 टक्के भाग काल (गुरुवार 16 जुलै) संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 24 जणांना बाहेर काढण्यात आले. तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु  (Mumbai Mayor Kishori Pednekar Meeting on dangerous buildings) आहेत.

संबंधित बातम्या : 

Bhanushali Building Collapse | भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत, पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

Bhanushali building collapse Live Update | भानुशाली इमारत दुर्घटना, एनडीआरएफच्या मदतीला श्वानपथक