Bhanushali building collapse Live Update | भानुशाली इमारत दुर्घटना, एनडीआरएफच्या मदतीला श्वानपथक

मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी इमारतीचा भाग कोसळून (Bhanushali building collapse) दुर्घटना घडली. Bhanushali building collapse

Bhanushali building collapse Live Update | भानुशाली इमारत दुर्घटना, एनडीआरएफच्या मदतीला श्वानपथक

मुंबई : मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी इमारतीचा भाग कोसळून (Bhanushali building collapse) दुर्घटना घडली. धोकादायक असलेल्या या इमारतीचा 40 टक्के भाग काल (गुरुवार 16 जुलै) संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 24 जणांना बाहेर काढण्यात आले असून आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी आहेत

या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. (Bhanushali building collapse)

Bhanushali building collapse LIVE UPDATE

शुक्रवार 17 जुलै

 • ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना शोधण्यासाठी एनडीआरएफकडून श्वान पथकाची मदत, शेरु आणि उदय या दोघा श्वानांकडून बचावकार्यात मदत
 • इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून सहा जणांचा मृत्यू
 • इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 24 जणांना बाहेर काढले
 • इमारत दुर्घटनेत तिघे गंभीर जखमी, जेजे रुग्णालयात  उपचार सुरु
 • गुरुवार 16 जुलै
 • एनडीआरएफच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करुन मलब्यातून आतापर्यंत 13 जणांना बाहेर काढलं, दुर्घटनेत आतपर्यंत 3 जणांचा मृत्यू

 •  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी जावून परिस्थितीचा आढावा घेतला

 • एनडीआरएफच्या पथकाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. हे रेस्क्यू ऑपरेशन रात्रभर सुरु राहण्याची शक्यता
 • अजूनही बचावकार्य सुरु, आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
 • आतापर्यंत चार जणांना मलब्यातून सुखरुप बाहेर काढण्यात यश, बचावकार्य सुरु/li>
 • पावसामुळे मदतकार्यात अडथळा, ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु, अधे मधे पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळे.
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल, मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात घटनास्थळी जाऊन पाहणी करणार

आतापर्यंत या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून चौघांना सुखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश आलं आहे. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची माहिती आहे (Mumbai Building Collapse)

इमारतीत 20 जण अडकल्याची भीती

“भानुशाली ही चार मजली रहिवाशी आणि व्यावसायिक इमारत आहे, या इमारतीचा 40 टक्के भाग कोसळला, काही लोक अडकले आहेत, त्यांना बाहेर काढलं जात आहे, आतमध्ये किती लोक आहेत अंदाज नाही, 20 लोक असण्याचा अंदाज आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा : महापौर किशोरी पेडणेकर

“भानुशाली या इमारतीचा भाग कोसळला आहे. म्हाडाचे अधिकारी पोहोचले आहेत. मी स्वत: घटनास्थळी जात आहे. या इमारतींबाबत मी सोमवारी मीटिंग घेत आहे. सध्या घटनास्थळी जाऊन माहिती घेईन”, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“मला मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीचा एक मालक आहे. त्याला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. पण इमारतीचा मालक आणि रहिवासी यांच्यात याविषयी चर्चा झालेली नसेल. मालकाने याबाबत रहिवाशांना माहिती दिली पाहिजे होती. इमारतीचं काम करायला हवं होतं. ही चालढकल झाली आहे. आता या दुर्घटनेनंतर नेमके किती जण अडकले आहेत ते कळत नाही. आताच एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे जे चालढकल करतात अशा मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.”असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *