AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034; दिग्गजांच्या उपस्थितीत, पायाभूत सुविधांवर होणार चर्चा…

पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनांची श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांना सादर केली जाणार आहे.

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034; दिग्गजांच्या उपस्थितीत, पायाभूत सुविधांवर होणार चर्चा...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 13, 2022 | 7:46 PM
Share

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह आसपासच्या मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींना एकाच मंचावर आणणाऱ्या ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034’ (Mumbai Metropolitan Region at 2034)या विशेष परिषदेचे आयोजन मुंबईत करण्यात येत आहे. लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे (Lok Sabha group leader MP Rahul Shewale) , खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde) यांच्या पुढाकाराने आणि कन्स्ट्रक्शन टाईम्सच्या सहकार्याने मुंबईच्या फोर सिझन हॉटेल येथे शनिवार, 15 ऑक्टोबर रोजी ही एकदिवसीय परिषद पार पडणार आहे.

या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर समारोपाच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनांची श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांना सादर केली जाणार आहे. तसेच परिषदेनंतर पायाभूत सुविधा क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मानही मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष परिषदेत रस्ते विषयक नवीन तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी मुक्त मुंबई-धारावी पुनर्विकास, शहरी दळणवळण, अतिवृष्टीमुळे साचणारे पाणी, रियल इस्टेट क्षेत्र अशा विविध क्षेत्रांतील समस्या आणि त्या सोडविण्यासाठी उपाययोजना याविषयी चर्चा केली जाणार आहे.

तसेच स्टॅक (STAC) समितीच्यावतीनेही विशेष सादरीकरण केले जाणार आहे. या परिषदेला, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एमआयडीसी), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( एसआरए), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अशा मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या शासकीय प्राधिकरणांचे सहकार्य लाभले असून राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि तज्ज्ञ मंडळी इथे आपले विचार मांडणार आहेत.

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034 या परिषदेच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा, या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासमोरील आव्हाने आणि यावर मात करण्यासाठी नेमक्या उपाययोजना याविषयीची विस्तृत चर्चा करण्याचा आमचा मानस असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

या परिषदेत तज्ज्ञ मंडळींनी सुचविलेल्या उपाययोजना आणि त्यांनी मांडलेली मते यांची एक श्वेतपत्रिका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात येईल.

तसेच या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाणर असल्याचेही खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सांगितले.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम