AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Monsoon : मुंबईत वयस्क जोडप्याने रिक्रीए केले ‘रिम झिम गिरे सावन’, सोशल मिडीयावर तुफान व्हायरल

'मंजिल' जुन्या हिंदी चित्रपटातील भिजलेली जुनी मुंबई दाखविणारे 'रिम झिम गिरे सावन' हे गीत नक्कीच सर्वांना मुंबईची भुरळ घालते. एका जोडप्याने हे हिंदी गीत रिक्रीए केले असून ते सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Mumbai Monsoon : मुंबईत वयस्क जोडप्याने रिक्रीए केले 'रिम झिम गिरे सावन', सोशल मिडीयावर तुफान व्हायरल
manzil - rim zim gire sawanImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 04, 2023 | 11:45 AM
Share

मुंबई : मुंबई – कोकण आणि देशभरातील बहुतांशी राज्यात मान्सून उशीरा का होईना पण दाखल झाला आहे. मान्सूनच्या धारांमध्ये सृष्टीत नवचैतन्य जणू पसरले आहे. आणि या कोसळत्या धारा अंगावर झेलण्यासाठी मुंबईकर आता निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बसले आहेत. गेला रविवार आणि हा रविवार गेटवे चिंब भिजण्यासाठी मुंबईकर जमू लागले आहेत. हिंदी चित्रपटात  प्रेम, विरह आणि खून-मारामारी अशा विविधांगी दृश्यांसाठी दिग्दर्शकांनी मुंबईच्या पावसाचा वापर केला आहे. गेटवेतील समुद्राच्या फेसाळत्या रौद्र लाटा, रस्त्यावर धावणाऱ्या बेस्टच्या बसेस आणि चिंब भिजणारे बिग बी अमिताभ आणि मौसमी चटर्जी यांचे ‘रिमझिम गिरे सावन’ हे गीत यावेळी हटकून आठवते. हे गीत एका जोडप्याने रिक्रीए केले आहे. सोशल मिडीयावर ते खूपच व्हायरल होत आहे.

मुंबईच्या पाऊसाचा वापर हिंदी चित्रपटात अनेक जणांनी केला आहे. अगदी अलिकडे राम गोपाल वर्मा यांच्या सत्या चित्रपटात मुंबईतला रिपरिपणारा पाऊसच एक व्हीलन वाटतो, तर ‘मंजिल’ जुन्या हिंदी चित्रपटातील भिजलेली जुनी मुंबई दाखविणारे ‘रिम झिम गिरे सावन’ हे गीत नक्कीच सर्वांना मुंबईची भुरळ घालते. बेल बॉटम पॅण्ट घातलेले बिग बी आपल्या लांब लंचक ढेंगाने पावसाचे पाणी उडविताना पाहून मजा वाटते. मंजिल चित्रपटातीली रिम झिम गिरे सावन हे गीत एका जोडप्याने त्याच गेटवे, मरिन ड्राईव्ह आणि ओव्हल मैदान येथे जाऊन रिक्रीए केले आहे. त्याच्या या व्हिडीओला ट्वीटरवर एका युजरने शेअर केले आहे.

हेच ते रिक्रीए गीत पाहा..

गीतकार योगेश गौंड यांनी लिहीलेले आणि आर.डी.बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायले आहे. योगेश गौंड यांना दादासाहेब फाळके पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. योगेश गौड यांनी अनेक सुपरहीट गीते लिहीली आहेत. त्यात आनंद चित्रपटातील कहीं दूर जब दिन ढल जाय, जिंदगी कैसी है पहेली, कई बार यू भी देखा हैं, अशी सदाबहार गाणी हृषिकेश मुखर्जी आणि बसु चटर्जी यांच्यासाठी लिहीली आहेत. गीतकार योगेश यांचे 77 व्या वर्षी 29 मे 2020 रोजी निधन झाले. त्यांनी मिली (1975), मंजिल (1979), छोटी सी बात (1975), रजनीगंधा (1974) या चित्रपटांसह अनेक हृदयास स्पर्श करणारी गाणी लिहीली आहेत.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?