AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?

Rustomjee Crown tower Action: मुंबईतील रुस्तुमजी क्राऊन या उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर महापालिकेने तोडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये काही फ्लॅट मंत्री महोदयांनी भाडेतत्त्वावर घेतले आहे. त्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. अतिक्रमण केल्याचे समोर आल्याने ही ॲक्शन घेण्यात आली आहे.

मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
मुंबईतील रुस्तुमजी क्राऊन या उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर महापालिकेने तोडक कारवाईचा निर्णय Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Aug 24, 2026 | 3:34 PM
Share

मुंबईतील रुस्तुमजी क्राऊन या उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर महापालिकेने तोडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण केल्याचे समोर आल्याने ही ॲक्शन घेण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका पॉश परिसरातील इमारतीवर थेट कारवाई होत असल्याने अनेकांची दाबे दणाणली आहेत. लिफ्ट परिसरातील मोकळ्या जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीवर मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे अनेक मंत्री महोदय, आजी माजी आमदार आणि मोठ्या व्यावसायिकांचे फ्लॅट या इमारतीमध्ये आहेत.

अतिक्रमित जागेची किंमत 250 कोटींहून अधिक

अतिक्रमित जागेची बाजारातील किंमत 250 कोटींहून अधिक असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता. या इमारतीच्या लिफ्ट परिसरातील मोकळ्या जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या टॉवरमध्ये 63 मजल्यांच्या तीन इमराती आहेत. आतापर्यंत दोन इमारतींना ओसी, ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याविषयीची तक्रार केली होती. त्यानंतर रुस्तुमजी क्राऊन या उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर महापालिकेने तोडक कारवाईचा निर्णय घेतला आहे.

या मंत्र्यांचा या इमारतीत फ्लॅट

मंत्री संजय राठोड, शीतल राठोड आणि समाधान सरवणकर यांच्या फ्लॅटचाही या इमारतीत समावेश आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या भाडेतत्त्वावरील फ्लॅटवरही कारवाई होणार असल्याचे कळते. टॉवरमध्ये राजकीय नेते, अधिकारी आणि व्यावसायिकांचे फ्लॅट आहे. अतिक्रमित परिसरातील जागेचा दर प्रति चौरस फूट एक लाख रुपयांहून अधिक आहे. टॉवरमध्ये 63 मजल्यांच्या तीन इमारती आहेत. दोन इमारतींना ओसी मिळाले आहे. लिफ्ट परिसरातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमित जागेची बाजारातील किंमत 250 कोटींहून अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. जी-साऊथ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई करण्यात येत आहे. टॉवरमध्ये राजकीय नेते, अधिकारी आणि व्यावसायिकांचे फ्लॅट आहेत. अतिक्रमित परिसरातील जागेचा दर प्रति चौरस फूट एक लाख रुपयांहून अधिक आहे.

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार