हात जोडून विनंती करते की…; नवनीत राणा यांचं बच्चू कडू आडसूळ यांना काय आवाहन?

| Updated on: Mar 28, 2024 | 12:53 PM

Navneet Rana on Bacchu Kadu and Anandrao Adsul : नवनीत राणा यांचं बच्चू कडू आडसूळ यांना आवाहन; म्हणाल्या, हात जोडून विनंती करते की... नवनीत राणा काय म्हणाल्या? टीकेला उत्तर देताना काय म्हणाल्या? अमरावतीतून उमेदवारी मिळाल्यावर नवनीत राणा काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

हात जोडून विनंती करते की...; नवनीत राणा यांचं बच्चू कडू आडसूळ यांना काय आवाहन?
Follow us on

भाजपने अमरावतीमधून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी काम करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी भाष्य केलं आहे. राणा यांनी अडसूळ आणि बच्चू कडू यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.  आजपर्यंत कधीही अमरावतीमध्ये कमळ फुललं नाही. यावेळी कमळ फुललं पाहिजे, असं अमरावतीकरांची इच्छा होती. आमची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केला, असं नवनीत राणा म्हणाल्या.

नवनीत राणांची विनंती काय?

मी आज आणि काली विनंती केली होती. सगळे एनडीएची जेवढे घटक आणि लीडर आहेत. त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं कारण मोदीजींच्या जे स्वप्न आहे. देशाला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे. कोणी काय म्हटलं आणि कोणी काही नाही म्हटलं. त्यांना उत्तर देताना फक्त माझे जेवढे ही सीनियर लीडर आहेत. त्यांना फक्त विनंती करू शकते. अमरावतीच्या विकासासाठी सगळ्यांनी सोबत आले पाहिजे. अबकी बार 400 पार आणि अमरावती उसमे से एक रहेगा. त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, असं नवनीत राणा म्हणाल्या.

विकासासाठी एकत्र आलं पाहिजे- नवनीत राणा

आनंदराव अडसूळ साहेब असू द्या, की बच्चू कडू असू द्या आमचे सगळे एनडीएचे घटक आहेत. तिकीट क्लियर हो परत हे सगळे चाललं आता सगळ्यांचे मनापासून शांत झालेला आहे. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्रासाठी मोदीजी जरुरी आहे. मोदीजींच्या हात मजबूत करण्यासाठी त्यांना हात जोडून विनंती करेल की नवनीत राणाला आशीर्वाद द्या. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र या आणि आपल्याला या खऱ्या अर्थाने एक संधी मिळाली आहेत त्या संधीच्या सोनं करूया, असं नवनीत राणा म्हणाल्या.

पाच वर्ष खासदार म्हणून त्यांनी मोदीजींच्या सोबत पूर्ण ताकतीना सपोर्ट केलेला आहे. मी आपलं पार्टीमध्ये राहून काम करेल. नवनीत राणाला तीन लाखापेक्षा जास्ती आम्ही अमरावतीमध्ये निवडून आणू. बावनकुळे साहेब सुद्धा काल बोलले.