AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास रस्त्यावरील लढाई तीव्र करु’, ओबीसी समाजाचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडलेल्या गोलमेज परिषदेत ओबीसी समाजाचे अनेक नेते उपस्थित होते. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरुन लढाई अधिक तीव्र करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

'मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास रस्त्यावरील लढाई तीव्र करु', ओबीसी समाजाचा ठाकरे सरकारला इशारा
sagar joshi
sagar joshi | Updated on: Nov 10, 2020 | 4:27 PM
Share

मुंबई: “मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. तसं केल्यास रस्त्यावरील लढाई अधिक तीव्र करु, असा इशारा ओबीसी समाजाकडून राज्य सरकारला देण्यात आलाय. मुंबईतील मराठी पत्रकार संघात ओबीसी समाजाची गोलमेज परिषद पार पडली. या गोलमेज परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्र लिहिण्यात आलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या आमदार संजय शिंदे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. (OBC community round table conference warns Thackeray government)

मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडलेल्या गोलमेज परिषदेत ओबीसी समाजाचे अनेक नेते उपस्थित होते. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरुन लढाई अधिक तीव्र करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. विधानसभेने राज्यातील जनमताचा आदर करुन सन 2021 ची सार्वत्रिक जनगणना जातनिहाय करावी असा ठराव मंजूर करण्यात आला होता. तरीही केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार नसेल तर महाराष्ट्र सरकारने तशी जनगणना करावी, अशी मागणी ओबीसी गोलमेज परिषदेचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

ओबीसी गोलमेज परिषदेच्या महत्वाच्या मागण्या

  • मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश होऊ नये.
  • सन 1931च्या जनगणनेनुसार देशात ओबीसी समाज 52 टक्के आहे. त्यामुळे 52 टक्के ओबीसींना 52 टक्के आरक्षण देण्यात यावे.
  • पुढे ढकलण्यात आलेल्या MPSCच्या परीक्षा कोणत्यागी दबावाला बळी न पडता लवकरात लवकर घेण्यात यावी.
  • इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात यावी.
  • शासकीय सेवांमधील ओबीसींचा अनुशेष लवकरात लवकर भरण्यात यावा.
  • कोणत्याही कारणास्तव मेगाभरती न थांबवता ती ताबडतोब करण्यात यावी. तत्पूर्वी दिनांक 22 ऑगस्ट 2019 रोजी बिंदूनामवलीला दिलेली स्थगिती तत्काळ उठवण्यात यावी.
  • ओबीसींच्या महाज्योती या संस्थेसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. संस्थेच्या कामाला शिघ्रगती प्राप्त होण्यासाठी ज्योतीदूतांची नेमणूक तातडीने करण्यात यावी.
  • महाज्योतीला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात यावा. एससी एसटी प्रमाणे सर्वच अभ्यासक्रमांसाठी 100 टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी.
  • ओबीसी समाजाची अनेक वर्षे थकीत शिष्यवृत्ती तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.
  • शासकीय सेवेतील ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे.

ओबीसी समाजाच्या गोलमेज परिषदेत वरील मागण्यांसह आणखी 15 मागण्यांचा ठराव आज पास करण्यात आला. सरकारने ओबीसी समाजाच्या या मागण्या तात्काळ मान्य कराव्या अशी मागणी ओबीसी गोलमेज परिषदेकडून करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

संभाजीराजेंनी OBC कोट्यातून मराठा आरक्षणाचा अभ्यास करु नये, नापास होतील : प्रकाश शेंडगे

OBC community round table conference warns Thackeray government

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या