मुंबईकरांनो आता एका क्लिकवर होणार कार पार्किंगचे बुकींग, नेमकी सुविधा काय?

| Updated on: May 21, 2021 | 9:38 AM

त्यामुळे पुढील तीन वर्षानंतर मुंबईकरांना मोबाईलवरुन पार्किंगची जागा अडवून ठेवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. (Mumbai book car parking spaces from mobiles)

मुंबईकरांनो आता एका क्लिकवर होणार कार पार्किंगचे बुकींग, नेमकी सुविधा काय?
car parking
Follow us on

मुंबई : राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत खासगी तसेच सार्वजनिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेकांना कार पार्किंगसाठी जागा मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर लवकरच मुंबईकरांना मोबाईलवरुन कार पार्किंगची जागा बुक करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Mumbai people will be able to book car parking spaces from mobiles)

तीन वर्षांचा कालावधी लागणार

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत लवकरच मोबाईलवरुन कार पार्किंगची जागा बुक करता येणार आहे. मोबाईलच्या एका क्लिकवरुन मुंबईत गाडीच्या पार्किंगसाठी जागा अडवून ठेवता येणार आहे. पण या सुविधेसाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मुंबई महापालिकेने वाहनतळांच्या नियोजनासाठी तज्ञांची समिती नियुक्त केली आहे. येत्या 2024 पर्यंत ही समिती मुंबईतील पार्किंगच्या समस्येवर अभ्यास करणार आहे. त्यानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले जाणार आहे.

वाहनतळांच्या नियोजनासाठी तज्ञांची समिती

मुंबईतील पार्किंगची समस्या आणि वाढत्या गाड्या लक्षात घेता वाहनतळांच्या नियोजनासाठी महानगरपालिकेने वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती वाहनतळ प्राधिकरणाची रुपरेषा बनवणार आहे. त्यासोबतच मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी माहिती पुरविण्याची जबाबदारी या समितीवर आहे. या समितीला कामकाज पूर्ण करण्याची मुदत एप्रिल 2024 पर्यंत आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षानंतर मुंबईकरांना मोबाईलवरुन पार्किंगची जागा अडवून ठेवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

4 कोटी 70 लाख रुपये खर्च करणार

तसेच या ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच पार्किचे शुल्कही भरण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्याची सोय करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महानगरपालिका याबाबतचा विचार करत आहे. टाटा समाजविज्ञान संस्थेचे वाहतूक क्षेत्रातील तज्ञ, नगररचनाकार, वाहतूक तज्ञ अशोक दातार, शिरीष जोशी यांच्यासह पालिकेचे निवृत्त अधिकारी निता निफाडे, प्रशांत मोरजकर यांचा या समितीत समावेश आहे. या समितीच्या शुल्कावर महानगरपालिका 4 कोटी 70 लाख रुपये खर्च करणार आहे.

या समितीचे नेमकं काम काय? 

  • विभागानुसार वाहानतळांसाठी आराखडा तयार करणार
  • कोणत्या विभागात कोणत्या प्रकारची वाहाने जास्त आहे. म्हणजे अवजड वाहने जास्त असलेल्या विभागात त्या प्रकारच्या वाहनतळांची सोय करण्यात येईल.
  • वाहनतळांसाठी जागा निश्‍चित करणार
  • विभागानुसार आराखडा तयार झाल्यावर ही समिती गरजेच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने वाहानतळांची जागा निश्‍चित करणार
  • जीआय, स मॅपिंग – प्रस्तावित वाहनतळांचे जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे.
  • त्याचा वापर मोबाईल ॲप्लिकेशन बनविण्यासाठी होणार

(Mumbai people will be able to book car parking spaces from mobiles)

संबंधित बातम्या : 

आधी पार्किंगची जागा दाखवा मगच कार खरेदी करा; सरकारची New Parking Policy

शानदार ऑफर! अवघ्या 1.5 लाखात Maruti Suzuki WagonR खरेदीची संधी