AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास, रोजची कमाई ५ ते १० कोटी, बँक खाते पाहून मुंबई पोलीस झाले हैराण

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी फसवणूक करणारी एक आंतरराष्ट्रीय टोळी उघड केली आहे. या टोळीचा म्होरक्या फक्त बारावी पास आहे. परंतु त्याची रोजची कमाई तब्बल पाच ते दहा कोटी आहे. मुंबई पोलीस असल्याचे सांगून ही टोळी लोकांची फसवणूक करत होती.

बारावी पास, रोजची कमाई ५ ते १० कोटी, बँक खाते पाहून मुंबई पोलीस झाले हैराण
mumbai police arrested accused
| Updated on: May 05, 2023 | 2:37 PM
Share

गोविंद ठाकूर, मुंबई : मुंबई पोलिसांच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढते आहेत. चीनमध्ये बसून लोकांची बँक खाती रिकामी करणारी टोळी पोलिसांनी शोधली आहे. या टोळीतील म्होरक्या फक्त बारावी पास आहे. परंतु त्याची रोजची कमाई पाच ते दहा कोटी रुपये होती. त्याचे टीम मेंबर अनेक शहरांमध्ये पसरले आहे. पुरुषांपेक्षा महिलांना टारगेट करुन ते फसवणूक करत होते. मुंबई पोलीस असल्याचे सांगून ही फसवणूक होत होती.

मास्टर माइंट अटकेत

पोलीस उपायुक्त (जोन -11) अजय कुमार बंसल यांनी सांगितले की, मास्टरमाइंट श्रीनिवास राव दाडी (49) फक्त 12 पर्यंत शिकला आहे. परंतु तंत्रज्ञानात खूप माहीर आहे. लोकांची फसवणूक करत कमवलेला पैसा दाडी त्याच्या पत्नीच्या खात्यात टाकत होता. एक दिवसाची कमाई पाच ते दहा कोटी होती. दाडी हा सर्व पैसा चीनमधील नागरिकास पाठवत होता आणि तो क्रिप्टोकरंसीमध्ये बदलत होता.

कोठून केली अटक

मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, या आरोपींना कोलकाता, मुंबई आणि विशाखापट्टणम येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, हैदराबाद, सायबराबाद, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्ये अशा ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

कोण आहेत आरोपी

सुमारे दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात संजय नीळकंठ मंडळ, अनिमेश अजितकुमार वैद्य, महेंद्र अशोक रोकडे, मुकेश अशोक दिवे यांचा समावेश आहे. मुख्य आरोपीचे नाव आहे श्रीनिवास राव सुब्बाराव दाडी (वय 49 वर्षे) आहे. तो हैदराबाद, तेलंगणाचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला विशाखापट्टणम येथील नोव्होटेल हॉटेलमधून अटक केली.

अशी करत होते फसवणूक

अटक करण्यात आलेले आरोपी स्वतःला मुंबई पोलिसांचे अधिकारी सांगत होते. त्यासाठी त्यांनी डुप्लिकेट पोलीस ओळखपत्र तयार केले होते. अनेक वेळा पोलिसांचा युनिफॉर्म घालून व्हिडिओ कॉलवर ते बोलत होते. लोकांना फोन करून तुमच्या नावाच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडले आहेत, असे सांगत होते. मग कारवाईच्या नावाखाली धमकावून त्यांचे बँक खाते व इतर तपशील घेऊन ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करत होते. बँकेचा तपशील मिळाल्यावर ५ मिनिटांत संपूर्ण बँक खाते रिकामा केले जात होता. जे काही पैसे ट्रान्सफर करायचे ते मुख्य आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात जात होते.

चीनचे काय आहे कनेक्शन

पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपीने सांगितले की, त्यांचा मास्टरमाइंड चीनमध्ये बसला आहे. त्याच्या इशाऱ्यावर लोक भारतातील विविध राज्यांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने ऑनलाइन फसवणूक करतात. यात मुख्य आरोपी श्रीनिवास सुब्बाराव दाडी याचा अल्पवयीन मुलगाही आहे, मात्र तो सध्या चीनमध्ये आहे.

हे ही वाचा

चीनमध्ये बसून मुंबई पोलिसांच्या नावाने फसवणूक, पाच मिनिटांत बँक खाते रिकामे, काय आहे प्रकार?

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.