ब्रिटीशकालीन वडाचे झाड तोडले, नागरिकांच्या ट्विटला थेट आदित्य ठाकरेंचा प्रतिसाद, पुढे काय झालं?

| Updated on: Feb 08, 2021 | 11:20 AM

महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याची बतावणी करुन गिरगावमधील ब्रिटिशकालीन वडाचे झाड तोडणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Mumbai cutting Banyan tree)

ब्रिटीशकालीन वडाचे झाड तोडले, नागरिकांच्या ट्विटला थेट आदित्य ठाकरेंचा प्रतिसाद, पुढे काय झालं?
अशा प्रकारे वडाचे झाड तोडण्यात आले.
Follow us on

मुंबई : महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याची बतावणी करुन गिरगावमधील ब्रिटिशकालीन वडाचे झाड तोडणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिकांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टॅग करत ट्विट केल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या प्रकाराची दखल घेतली. ठाकरे यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन तोडलेल्या झाडाची पाहणी केली होती. त्यांनतर झाड तोडणाऱ्या 5 पैकी 2 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. (Mumbai police arrested the five suspects for cutting the Banyan tree)

नेमका प्रकार काय?

मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ एक ब्रिटिशकालीन वडाचे झाड होते. या झाडाला कापण्यासाठी पाच जणांनी महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याची बतावणी केली. त्यांनतर रस्त्याच्या बाजूला बॅनर लावल्यानंतर जास्त पैसै मिळतात म्हणून त्यांनी मंगळवारी रात्री हे वडाचे झाड कापले. स्थानिकांनी झाड कापणाऱ्यांना याबद्दल विचारणा केली असता, आपण महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, झाड कापण्याची महानगरपालिकेने परवानगी दिल्याची बतावणीही त्यांनी केली.

नागरिकांच्या ट्विटची दखल

त्यांनतर वडाचे झाड कापणाऱ्या 5 जणांच्या भूमिकेवर संशय आल्यानंतर गिरगाव चौपाटीवरील नागरिकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत हा प्रकार ठाकरे यांना कळवला. या घटनेची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेत, झाड कापल्यानंतर दुसऱ्या दिवशी घटनास्थळाची पाहणी केली.

दरम्यान, झाड कापणाऱ्या 5 संशयितांना पोलिसांनी माहीम परिसरातून शनिवारी ताब्यात घेतलं. हिरालाल सेवकराम दर्शन, मोहम्मद शफीक उर्फ अब्दुल इकबाल अशी पाच पैकीं दोन संशयितांची नावं आहेत. पोलिसांकडून या संशयितांची चौकशी सुरु आहे.

 

संबंधित बातम्या :

मुंबईत 24 ठिकाणी बहरली ‘मियावाकी’ वने; तब्बल 1 लाख, 62 हजार 398 वृक्षांचं रोपण

Cyclone Nisarga | मुंबई-अलिबागमध्ये झाडं कोसळली, पुण्यात धावत्या कारवर झाड पडले, जीवितहानी नाही

(Mumbai police arrested the five suspects for cutting the Banyan tree)