मुंबईत 24 ठिकाणी बहरली ‘मियावाकी’ वने; तब्बल 1 लाख, 62 हजार 398 वृक्षांचं रोपण

पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आलेल्या 24 ठिकाणच्या मियावाकी वन आता चांगलीच बहरली आहे. (BMC Planting Miyawaki Forest in City)

मुंबईत 24 ठिकाणी बहरली 'मियावाकी' वने; तब्बल 1 लाख, 62 हजार 398 वृक्षांचं रोपण
मियावकी वनं

मुंबई : मुंबई शहरात अनेक प्रकल्पामुळे झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मुंबईतील झाड कमी होत आहेत असं बोललं जातं आहे. याला पर्याय मुंबई महापालिकेने निवडला आहे. पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची ‘मियावाकी’ वने विकसित करण्याचा अभिनव प्रकल्प गेल्यावर्षी गेल्यावर्षीपासून राबवण्यात येत आहे. (BMC Planting Miyawaki Forest in City)

गेल्यावर्षी गणराज्य दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून ‘मियावाकी’ वनांच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या गेल्या वर्षभरात महापालिका क्षेत्रातील विविध 64 ठिकाणी टप्प्याटप्प्याने ‘मियावाकी’ वन लावण्यात आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आलेल्या 24 ठिकाणच्या मियावाकी वन आता चांगलीच बहरली आहे.

या 24 ठिकाणी तब्बल 1 लाख, 62 हज़ार 398 झाडे लावण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश झाडांनी अवघ्या वर्षभरातच चार ते पाच फुटांची उंची गाठली आहे. केवळ वर्षभरात या वनांमधील झाडांनी एवढी उंची गाठणे, हे वनांची वाढ योग्य प्रकारे होत असल्याचे लक्षण आहे. ही वने मुंबईकरांना प्राणवायू देण्यासाठी तयार होत आहेत .

‘मियावाकी’ वनांचे वैशिष्ट्ये

कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी ‘मियावाकी’ वने ही आपल्या कोकणातील ‘देवराई’शी आणि सिंगापूर सारख्या शहरांमध्ये असणाऱ्या ‘अर्बन फॉरेस्ट’ संकल्पनेशी नाते सांगणारी आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात रुजवात करण्यात आलेल्या 24 वनांसोबतच आणखी 40 ठिकाणी मियावाकी वनांची कामे प्रगतिपथावर आहेत.

सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात.

एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यातुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते.

तसेच साधारणपणे 2 वर्षात विकसित होणाऱ्या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात.

या वनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीची साधारणपणे दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते.

त्यानंतर ही वने नैसर्गिकरित्या वाढत राहतात आणि आपल्याला अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात. ही बाब लक्षात घेतल्यास मुंबईतील मियावाकी वनांना मुंबई शहराची फुफ्फुसे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 24 ठिकाणी वाढत असलेल्या मियावाकी वनांमध्ये विविध 47 प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.

यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सिताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरु, बदाम, काजू, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. (BMC Planting Miyawaki Forest in City)

संबंधित बातम्या : 

तात्याराव लहानेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, दरेकर म्हणाले…

संजय राऊतांचा जावई पाहिला का? कन्येच्या साखरपुड्याचे खास फोटो तुमच्यासाठी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI