जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात आल्यास आधी रुग्णालयात न्या, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश

| Updated on: Jun 17, 2021 | 12:47 AM

जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात आल्यास आधी रुग्णालयात न्या आणि मग नियमानुसार कायदेशीर कारवाई करा, असे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली आहेत.

जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात आल्यास आधी रुग्णालयात न्या, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे
Follow us on

मुंबई : कोणतीही जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात आली आणि त्याला उपचारांची गरज भासू लागल्यास स्वत: पोलीस ठाण्याच्या हवालदाराने त्याला सरकारी रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले पाहिजे. वैद्यकीय उपचारानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून मग नियमानुसार उर्वरित कारवाई करा, असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत (Mumbai Police commissioner order to give treatment injured people coming to police station).

नगराळे यांनी आपल्या आदेशात लिहिलं आहे, “कोणतीही जखमी व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये येत असेल तर त्याला रुग्णालयात पाठवलं जातं आणि बर्‍याच वेळा ते स्वत: उपचार आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात जातात, असं यापूर्वी माझ्या लक्षात आलं आहे. ते चुकीचं आहे. असं करू नका. जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात हजर होताच त्याचा मेडिकल मेमो बनवून त्याला सरकारी रूग्णवाहिकेत रुग्णालयात घेऊन जा.”

या आदेशाचं पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असाही इशारा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिलाय.

बाल कामगारविरोधी दिनाच्या निमित्तानेही सामाजिक संदेश

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त कायमच आपल्या ट्विटर हँडलवरुन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. याआधी बाल कामगार दिनाच्या  निमित्ताने त्यांनी ट्विट करत बाल कामगारांना शिक्षण देण्याचं आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते, “या निरागस हातांचा योग्य वापर पुस्तकांसाठी आहे, कामासाठी नाही. बाल कामगाराचा विरोध करूया, देशाचे भविष्य उज्ज्वल करूया.”

हेही वाचा :

अमेरिकेत MBA, भारतात शेकडो लोकांची ऑनलाईन फसवणूक, भामट्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लॉकअप तोडून कुख्यात दरोडेखोर पळाला, पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रभर हिंडला, अखेर मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पेट्रोलपंपाच्या लायसन्सच्या नावाखाली 45 लाखांचा गंडा, तपासासाठी मुंबई पोलीस थेट बिहारमध्ये, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

व्हिडीओ पाहा :

Mumbai Police commissioner order to give treatment injured people coming to police station