अमेरिकेत MBA, भारतात शेकडो लोकांची ऑनलाईन फसवणूक, भामट्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ब्रिजभान जैस्वार

| Edited By: |

Updated on: Jun 16, 2021 | 7:19 AM

अमेरिकेतून एमबीए पूर्ण केल्यानंतर, भारतातील 100 पेक्षा (Cheating With Hundres) जास्त जणांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या व्यक्तीला मुंबई पोलिसानी अटक केली आहे. आरोपी हा बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचं तपासात उघड झालं आहे

अमेरिकेत MBA, भारतात शेकडो लोकांची ऑनलाईन फसवणूक, भामट्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
MBA Man Did Fraud With Many

Follow us on

मुंबई : अमेरिकेतून एमबीए पूर्ण केल्यानंतर, भारतातील 100 पेक्षा (Cheating With Hundres) जास्त जणांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या व्यक्तीला मुंबई पोलिसानी अटक केली आहे. आरोपी हा बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचं तपासात उघड झालं आहे (MBA Completed Man Did Cheating With Hundres To Lure Them To Give The Children Chance In Movies).

काय होती मोड्स ऑपरेंडी ?

मुंबई क्राईम ब्रान्चच्या सायबर सेलने लहान मुलांना बॉलिवूड फिल्म आणि जाहिरातीमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याच्या आरोपाखाली या व्यक्तीला अटक केली आहे.

अपूर्व अश्विन दौडा ऊर्फ डॉक्टर ऋषी श्रॉफ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो 47 वर्षांचा आहे. सायबर सेल तर्फे देण्यात आलेल्या माहिती प्रमाणे आरोपीने विमानाच्या स्पेयर पार्ट्सचा व्यापारासोबत 32 लाख 69 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती. त्यानंतर सायबर सेलची टीम त्या आरोपीचा शोध घेत होती आणि आता त्याला अटक करण्यात आली आहे. अपूर्वविरोधात मुंबईतील साकीनाका, आंबोली, ओशिवारा, एन.एम. जोशी आणि दादर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सायबर सेलच्या माहिती प्रमाणे, अटकेत असलेला आरोपी जारा किड्स आणि जारा वर्ल्ड नावाच्या दोन बनावट वेबसाईट्स चालवत होता. त्या वेबसाईटच्या माध्यमातून तो लोकांशी संपर्क साधत होता. तसेच, तो मोठ्या प्रमाणात लोकांना मेसेज ही पाठवायचा की “आम्ही टेलिव्हिजन जाहिरातींसाठी कास्ट करीत आहोत. आपली इच्छा असेल तर कृपया नाव, जन्मतारीख व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवा आणि आम्ही बॉलीवूड चित्रपटांसाठी कास्ट करत आहोत आणि तुमची मुले वय वर्ष 2 ते 14 वर्षाच्या मध्ये असतील तर कृपया आपल्या मुलाचा फोटो आणि जन्मतारीख पाठवा.

मुलांना फिल्म किंवा जाहिरातमध्ये काम देण्याचं प्रलोभन….

तो लोकांना सांगायचा की, आपण “बच्चों की दुनिया” नावाचा चित्रपट बनवित आहे आणि त्याच चित्रपटासाठी मुलांना कास्ट करायचे आहे.

यानंतर जो कोणी त्याच्याशी संपर्क साधत असे, त्या मुलाचा फोटोशूट करायचाय, मुलासाठी वेशभूषा विकत घ्यायचीये अशी वेगवेगळी कारणं देऊन तो लोकांकडून पैशांची मागणी करत असत. तपासणी दरम्यान असे आढळले की अपूर्वने 100 पेक्षा जास्त लोकांची अशीच फसवणूक केली असून फसवणूक केलेले पैसे मिळवण्यासाठी तो 18 बँकांचे अकांउन्ट वापरत होता.

आरोपी अपूर्वने पोलिसांना सांगितले की, त्याने बर्‍याच शोमध्ये आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने अमेरिकेत कोलोरॅडोच्या टीएफटी बिझिनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्याने आपली लोकेशन लपविण्यासाठी 9 मोबाईल फोन (8 आयफोन आणि 1 सॅमसंग फोन) वापरत होता. पोलिसांना त्याच्याकडून 40 सिमकार्ड सापडले आहेत. आरोपीने सांगितले की, तो भारताच्या वेगवेगळ्या राज्यात भाडे तत्वावर कार्यालय घेऊन लोकांची फसवणूक करायचा आणि लोकांशी संपर्क स्थापित करण्यासाठी व्हाट्सअॅप कॉलिंग आणि व्हीपीएन कॉलिंगचा वापर करीत होता.

महागड्या गाड्यांचा शौक

आरोपी अपूर्व यांनी पोलिसांना सांगितले की 2017 पासून तो या मार्गाने लोकांना फसविण्याचे काम करत होता आणि आतापर्यंत त्याने 2 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे. आरोपीला महागड्या वाहनांची फार आवड होती. तो फिरण्यासाठी मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, पोर्चे यासारख्या लक्झरी वाहनांचा वापर करत होता.

MBA Completed Man Did Cheating With Hundres To Lure Them To Give The Children Chance In Movies

संबंधित बातम्या :

दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद

वय अवघं 22, तब्बल 56 गुन्हे, खडकपाडा पोलिसांकडून 27 वा मोस्ट वॉण्टेड चोरट्याचा खेळ खल्लास

पेट्रोलपंपाच्या लायसन्सच्या नावाखाली 45 लाखांचा गंडा, तपासासाठी मुंबई पोलीस थेट बिहारमध्ये, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI