AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Police: सिल्व्हर ओकवर हल्ला होणार याची माहिती पोलिसांना होती?; पोलिसांच्या विशेष शाखेचं पत्रं टीव्ही9च्या हाती

Mumbai Police: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला होणार होता. याबाबतची माहिती पोलिसांना होती. तसेच सहायक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनाही याची माहिती दिली होती, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mumbai Police: सिल्व्हर ओकवर हल्ला होणार याची माहिती पोलिसांना होती?; पोलिसांच्या विशेष शाखेचं पत्रं टीव्ही9च्या हाती
सिल्व्हर ओकवर हल्ला होणार याची माहिती पोलिसांना होती?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 11, 2022 | 10:00 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला होणार होता. याबाबतची माहिती पोलिसांना होती. तसेच सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (vishwas nangre patil) यांनाही याची माहिती दिली होती, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांच्या विशेष शाखेचं याबाबतचं पत्रं टीव्ही9च्या हाती लागलं आहे. त्यामुळे पोलिसांनी हा हल्ला का रोखला नाही? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याची माहिती मीडियाला होती. मात्र, पोलिसांना (police) हल्ल्याची माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे विरोधकांनी पोलिसांना या हल्ल्याची माहिती का मिळाली नाही? असा सवाल करेला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हाच सवाल केला होता. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर आता हे पत्रं बाहेर आल्याने सिल्व्हर ओकवर हल्ला होणार असल्याचं पोलिसांना माहीत होतं असं उघड झालं आहे.

दिनांक 4 एप्रिल रोजीचं हे पत्रं आहे. एसटी कर्मचारी अधिक आक्रमक होऊन आंदोलन करणार असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 10 नोव्हेंबर 2021पासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात 10 नोव्हेंबर 2021 ते 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021पर्यंत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करणअयात आले. त्यानंतनर इतर नेत्यांच्या मार्गदर्शनात आंदोलन सुरू आहे. 5 एप्रिल 2022 रोजी न्यायालयाचा निकाल येणार असल्याने 1500 ते 1600 तरुण येऊन जाऊन आहेत. आंदोलनस्थळी आंदोलकांची संख्या वाढत आहे. विलीनिकरणाचा निर्णय आपल्या विरोधात जाण्याची जाणीव त्यांना झाली आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

बंदोबस्तही मागितला होता

एसटी कर्मचाऱ्यांनी 4 एप्रिल 2022 रोजी मंत्रालय आणि दिनांक 5 एप्रिल रोजी सिल्व्हर ओक, मातोश्री या ठिकाणी आंदोलन करण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एसटी कर्मचारी खासगी वाहनाने किंवा एसटीने येण्याची शक्यता आहे. खासगी वाहनाने मुलुंड चेक नाका आणि दहिसर नाका येथून प्रवेश करणार आहेत. या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी विनंती आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

mumbai police

सिल्व्हर ओकवर हल्ला होणार याची माहिती पोलिसांना होती?

मातोश्री आणि परबांच्या घरावरही हल्ला होण्याची भीती

आंदोलक त्यांच्या मागण्यांवर ठाम असल्याने आझाद मैदान, मंत्रालय, मातोश्री, सह्याद्री अतिथी गृह, सिल्व्हर ओक, परिवहन मंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आदी ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं या पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे हल्ल्याची माहिती असूनही पोलिसांनी या माहितीकडे दुर्लक्ष केलं का? असा सवाल केला जात आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra Kesari | ऑलिंपिकचं स्वप्न, परदेशात जायचंय, पण बक्षीसाची अद्याप रक्कम नाही, महाराष्ट्र केसरीची शरद पवारांकडे खंत

Jayant Patil: हिशोबच मांडायचाय तर उद्धव ठाकरे मोदींकडे मांडतील, हिशोबावरून जयंत पाटील आणि दानवेंमध्ये जुंपली

Sanjay Raut: कुठे आहेत दोन ठग?, सोमय्या देशाबाहेर पळून जाऊ शकतात; राऊतांना शंका

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?