लालबाग, परळमध्ये गणेशभक्तांना ‘नो एंट्री ’; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा निर्णय

| Updated on: Sep 07, 2021 | 11:42 AM

कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरतीता लालबाग आणि परळ अशा ठिकाणी गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. मुंबईत काळाचौकी, लालबाग आणि परळ याठिकाणी अनेक नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी केली जाते.

लालबाग, परळमध्ये गणेशभक्तांना ‘नो एंट्री ’; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा निर्णय
मुंबई पोलीस
Follow us on

मुंबई: गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि कोरोनाची तिसरी लाट या पार्श्वभूमीवर प्रसासन कामाला लागलं आहे. पोलीस प्रशासनानं गणेशोत्सवानिमित्त उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरतीता लालबाग आणि परळ अशा ठिकाणी गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. मुंबईत काळाचौकी, लालबाग आणि परळ याठिकाणी अनेक नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी केली जाते.

ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा

मुंबईत गणेशोत्सव धडाक्यात साजरा केला जातो. कोरोना विषाणू संसर्गामुळं उत्साहावर मर्यादा आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी गणेशभक्तांना लालबाग, परळ, काळाचौकी भागात गणेश भक्तांनी येऊ नये असं आवाहन केलं आहे. यंदा कोरोनामुळे भाविकांनी प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन न घेता फक्त ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे उत्सव कालावधीत लालबाग परळमध्ये राज्यातून येणाऱया भक्तांना याठिकाणी ‘नो एण्ट्री’ असणार आहे.

जगभरातून भाविक मुंबईत

मुंबईतील लालबाग, परळ आणि काळाचौकी या ठिकाणी मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. आर्कषक देखावा, उंच गणेशमूर्ती आणि इतर अनेक कारणांसाठी येथील अनेक नामांकित मंडळाच्या गणपतींना देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भक्तगण दर्शनाला येत असतात.

मुंबईतील प्रमुख गणेश उत्सव मंडंळं

लालबागचा राजा, गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकीचा महागणपती, तेजुकायचा राजा, नरेपार्कचा राजा यासारख्या अनेक मंडळांचा यात समावेश असून या मंडळांच्या गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्तगण दर्शनाला येत असतात.

आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं आवाहन

कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही. जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाची बैठक सोमवारी पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वच राजकीय पक्ष आणि नागरिकांना आवाहन केलं आहे.

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या:

“मंदिरं उघडण्याची हिंमत मनसेत नाही, त्यांचं आंदोलन भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम”

करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, ड्राव्हरला एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Police said people should not came to Lalbad Paral area during Ganesh Festival due to corona