“मंदिरं उघडण्याची हिंमत मनसेत नाही, त्यांचं आंदोलन भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केलं. औरंगाबादमध्ये मनसेने मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र  मनसेच्या मंदिर उघडण्याच्या मागणीवर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केलं. औरंगाबादमध्ये मनसेने मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र  मनसेच्या मंदिर उघडण्याच्या मागणीवर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. मनसेचं आंदोलन म्हणजे भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी केली.

मंदिरं उघडण्याची हिंमत मनसेत नाही, मनसे नादी लागू नये. मनसेचं आंदोलन म्हणजे भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे, असा हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी केला.

मनसेचं आंदोलन 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज औरंगाबाद शहरात मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील गुलमंडीवर असलेल्या सुपारी हनुमान मंदिरासमोर हे आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी घंटानाद करत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना तब्यात घेतले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI