AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Police Salary Fraud : मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, यात किती जण सामील? घोटाळा झाला कसा?

Mumbai Police Salary Fraud : चोरांना पकडण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. पण आता पोलिसांवरच आपल्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे. कारण मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा उघडकीस आला आहे. या बाबत पोलिसांनी कारवाईची पावलं उचलली आहेत.

Mumbai Police Salary Fraud : मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, यात किती जण सामील? घोटाळा झाला कसा?
Mumbai Police
| Updated on: Aug 04, 2026 | 11:58 AM
Share

मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तत्कालीन प्रमुख लिपिक आरोपी विजया चव्हाण आणि तत्कालीन वरिष्ठ लिपिक अमोल मेम्राम यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दोघांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. समतानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करून आणि कट रचून वेतन घोटाळा केल्याचा आरोप आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघेही ‘सेवेतून निलंबित’ राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सहपोलीस आयुक्त प्रशासन यांच्याकडून निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पोलीस नसलेल्या व्यक्तींना पोलीस कर्मचारी असल्याचे दाखवून कोट्यवधींचा वेतन घोटाळा केल्याचा आरोप आहे. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण यांच्यासह इतरांवर गंभीर आरोप आहेत. खोटी वेतन देयके सादर करून शासकीय निधीचा गैरवापर व अपहार केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात शासनाची तब्बल ६ कोटी ४१ लाख १४ हजार ३६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

आरोप काय?

प्रमुख लिपिक अजय राठोड व कनिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांचाही प्रकरणात समावेश आहे. संबंधितांविरोधात फसवणूक, अपहार, बनावट कागदपत्रे तयार करणे व पुरावे नष्ट करण्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. भादंवि कलम 409, 420, 406, 467, 465, 471, 201, 120(ब) व 34 अन्वये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कधी झाला घोटाळा 

2019 आणि 2020 मध्ये हा घोटाळा झाला. 2019 च्या डिसेंबरमध्ये आणि त्यानंतर 2020 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, त्यानंतर जून ते सप्टेंबर 2020 दरम्यानच्या वेतनात हा घोटाळा झाल्याचा संशय आहे. तपासात 2019 ते 2020 मधील वेतन खात्यात तफावत आढळून आली आहे. वेतन व प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासकीय आणि वेतन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा अपहार केल्याचा संशय आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी