भर रस्त्यावर दाखवायचा मुलींचे फोटो…पोलिसांनी विचारताच समोर आलं भयानक सत्य; नव्या कांडामुळे मुंबई हादरली!

मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती रस्त्यावर उभे राहून मुलींचे फोटो दाखवत होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे.

भर रस्त्यावर दाखवायचा मुलींचे फोटो...पोलिसांनी विचारताच समोर आलं भयानक सत्य; नव्या कांडामुळे मुंबई हादरली!
Sex racket
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 29, 2025 | 4:15 PM

दक्षिण मुंबईतील अतिशय गर्दीच्या भागात असलेल्या डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर उभ्या राहून एक दलाल येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांना अडवत होता आणि त्यांना मोबाईलमध्ये मुलींचे फोटो दाखवून ग्राहक शोधत होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सापळा रचला आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. चौकशीअंती एक मोठं हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग (डी. बी. मार्ग) पोलीस पथकाने सोमवारी दयानंद बिल्डिंग परिसरात गस्त घातली होती. याचवेळी मुकेश कुमार रामजी यादव (वय ५०) नावाचा व्यक्ती रस्त्यावर फिरताना दिसला. तो ये-जा करणाऱ्या पुरुषांना थांबवून आपल्या मोबाईलमध्ये असलेले काही मुलींचे फोटो दाखवत होता. शिवाय व्हॉट्सअॅपवरूनही फोटो पाठवून ग्राहकांना आकर्षित करत होता.

वाचा: गिरिजा ओकच्या सौंदर्यावर इम्रान हाश्मी फिदा, विमानत तिला पाहिलं अन् सतत.. काय घडलं?

आरोपीला करण्यात आली अटक

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मुकेश यादवला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली. अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केला. तो वेश्याव्यवसायासाठी ग्राहक शोधण्याचं काम करत होता आणि यातून मोठी दलाली कमवत होता. ग्राहकांना मुलींचे फोटो दाखवून त्यांना व्यवसायात प्रवृत्त करणं आणि संपर्क साधणं, असं त्याचं काम होतं. या दलालीतून तो भरपूर पैसे कमवत होता.

मोठे नेटवर्क आले समोर

आरोपी मुकेश यादवला आता अटक करण्यात आली आहे. या सेक्स रॅकेटमध्ये त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी आहे का? तसेच तो मुली कुठून आणत होता आणि हे नेटवर्क कशा पद्धतीने चालत होतं, याचा तपास डी. बी. मार्ग पोलीस सध्या करत आहेत. या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.