AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेस क्लब निवडणुकीची मुंबईभर चर्चा; संपादक खांडेकर विरुद्ध गांगण आमनेसामने

मुंबई प्रेस क्लब निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा आहे. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि हिंदुस्तान टाइम्सचे असोसिएट एडिटर सुरेंद्र गांगण अध्यक्षपदासाठी आमनेसामने आहेत. प्रिंट विरुद्ध इलेक्ट्रॉनिक वाद, समर खडस वाद आणि टीव्हीजे व टाइम्सच्या मतांचा प्रभाव ही या निवडणुकीतील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रेस क्लब निवडणुकीची मुंबईभर चर्चा; संपादक खांडेकर विरुद्ध गांगण आमनेसामने
Khandekar vs GanganImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 7:00 PM
Share

मुंबईत सध्या पत्रकारांच्या तसेच राजकारण्यांच्या वर्तुळात मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत रंगत आणली ती टीव्ही आणि प्रिंटच्या संपादकांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर हे अध्यक्षपदासाठी उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात हिंदुस्तान टाइम्सचे असोसिएट एडिटर सुरेंद्र गांगण उभे आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रिंट विरुद्ध इलेक्ट्रॉनिक वाद

या निवडणुकीत प्रिंट विरुद्ध इलेक्ट्रॉनिक अशी वादाची किनार आहे. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटचे संपादक या निवडणुकीत उतरल्याने हा वाद केंद्र स्थानी आला आहे. मात्र, हा वाद किती तीव्र आहे हे मतदानातूनच समोर येणार आहे.

खडस वादाचं वावटळ

समर खडस यांची राजेश कुमार यांच्याशी झालेला वाद हा सुद्धा या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. मागच्या वेळी झालेल्या या वादावरून या निवडणुकीत खडस यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे पीडीएला बदनाम केलं जात आहे. विशेष म्हणजे समर खडस हे निवडणूक लढत नाहीयेत. तरीही त्यावरून राजीव खांडेकर यांना प्रश्न विचारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जो व्यक्तीच निवडणूक लढत नाहीये, त्याचा प्रत्यक्ष या निवडणुकीशी संबंध नाही, त्यावरून आरोपाची राळ उडवून साप साप म्हणून भूई थोपटण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक भरकटवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा पीडीएने केला आहे.

वाद का रंगला, चर्चा कशाची?

राजेश कुमार आणि समर खडस यांच्यात वाद झाला होता. प्रेस क्लबमध्ये डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली होती. डॉक्युमेंट्रीची स्क्रिनिंग होती. आधी स्क्रिन आणि नंतर प्रश्नोत्तरे असं नियोजन करण्यात आलं होतं. पण पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आधीच कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे समर खडस यांनी सर्व कॅमेरामन यांना कॅमेरे बाजूला काढण्यास सांगितले. आधी स्क्रिनिंग होऊ द्या. नंतर प्रश्नोत्तरे असताना कॅमेरे लावा असं त्यांनी सांगितलं. पण त्याला कॅमेरामनसहीत राजेश कुमार यांनी विरोधक केला. त्यांनी बाहेर जाण्यास नकार दिला. स्क्रिनिंगसह शूट करायचं असं त्यांचं म्हणणं पडलं. तर युट्यूबवर ऑलरेडी डॉक्युमेंट्री आहे. त्यातून तुम्ही शॉट घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही कॅमेरे लावू नका, असं खडस समजावत होते. पण राजीव कुमार आणि इतर कॅमेरामन ऐकायला तयार नव्हते. त्यातून शाब्दिक चकमक झाली. हुज्जत घालण्यात आली. खडस यांचा पारा चढला. त्यांनी अर्वाच्च भाषेत राजीव कुमार यांना झापलं. त्यानंतर त्यांनी ट्रायपॉड उचलून बाहेर ठेवले. त्याचा कॅमेरामन यांना राग आहे. म्हणूनच खडस यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी आजपर्यंत  केली जातेय. खडस यांनी आजवर माफी न मागितल्यानेच या निवडणुकीत खडस यांचा मुद्दा पुढे करून पीडीए पॅनलच्या विरोधात हवा तयार केली जात आहे. खडस निवडणूक लढवत नसले तरी त्यांच्या पॅनलमधून राजीव खांडेकर निवडणूक लढवत असल्यानेच खडस यांच्या मुद्द्यावरून खांडेकरांना घेरलं जात आहे.

कोण आहेत खडस आणि राजेश कुमार?

समर खडस हे महाराष्ट्र टाइम्सचे राजकीय पत्रकार आहेत. राजकीय विश्लेषक आहेत. तसेच लेखक, नाटककारही आहेत. तर राजेश कुमार हे इंडिया टीव्हीचे असोसिएट एडिटर आहेत. राजेश कुमार हे इंडिया टीव्हीच्या महाराष्ट्र ब्युरोमध्ये कार्यरत आहेत.

टीव्हीजेच्या मतांसाठी जोरबैठका

दरम्यान, या निवडणुकीत टाइम्स नंतर टीव्हीजेची मते निर्णायक मानली जात आहेत. त्यामुळेच राजीव खांडेकर यांनी टीव्हीजेच्या सदस्यांशी संवाद साधून आपली भूमिका मांडली. तसेच मतदान करण्याचं आवाहन केलं. खांडेकर यांनी ही बैठक घेतल्यानंतर लगेचच सुरेंद्र गांगण यांनीही टीव्हीजेच्या सदस्यांची बैठक बोलावली आणि आपली भूमिका स्पष्ट करत मतदानाचं आवाहन केलं.

प्रेस क्लबवर कुणाचं वर्चस्व?

प्रेस क्लबच्या निवडणुकीत टाइम्स ऑफ इंडियातील मतदान हे गेमचेंजर मानलं जातं. टाइम्सची मतेही नेहमीच निर्णायक ठरली आहेत. टाइम्सच्या मतांमुळेच प्रेस क्लबवर कुणाचं वर्चस्व असणार हे ठरतं. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचं एकगठ्ठा मत ज्या पॅनलला पडतं ते पॅनल निवडून येतं, असं सांगितलं जातं. त्यामुळे या निवडणुकीत आता टाइम्स ग्रुप आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

खांडेकर यांची भूमिका

अनेकांना आश्चर्य वाटलं की निवडणुकीच्या राजकारणापासून कायम लांब असताना मी या निवडणुकीत कसं उतरलो? मी ग्रामीण भागातून आलो, तेव्हा प्रेस क्लबची मेंबरशीप मिळेल याची आस आम्हाला होती. मुंबईच्या विचार विश्वाचं प्रेस क्लब केंद्र स्थान होतं. गेल्या काही काळात देशविरोधी शक्ती या ठिकाणी प्रस्थान बसवू पाहतात असं चित्र होतं. त्याच अस्वस्थेतून मी या निवडणुकीत उतरलो. जे होतं ते पाहत राहणं योग्य नसल्याने मी निवडणुकीत उतरलो, असं राजीव खांडेकर यांनी सांगितलं. समाजात जसे भेदाभेद तसेच भेदाभेद प्रेस क्लबमध्ये आले. प्रिंट विरुद्ध चॅनल वगैरे वाद आले. या सर्व गोष्टीची चिंता वाटली म्हणून नवा प्रवाह करण्यासाठी मी यात उतरलो. मी आठवड्याचे तीन दिवस दिल्लीत असतो. दिल्लीत विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी अनेक ठिकाणं आहे. दुर्देवाने मुंबईत असं ठिकाण राहिलं नाही. जे होतं ते हातातून जात आहे. त्यामुळे प्रेस क्लबला विचार विश्वाचं केंद्र बनवावं असं वाटलं म्हणून मी या निवडणुकीत उतरलो आहे, असं खांडेकर म्हणाले.

गांगण यांची भूमिका

आम्ही ही निवडणूक चुरशीने लढत आहोत. आम्ही अध्यक्ष झाल्यावर ज्या घडलेल्या घटनांची चौकशी करू. जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईल. पूर्वी सौहार्दाचं वातावरण होतं. प्रिंट आणि टीव्ही असा वाद नव्हता. तो दूर केला जाईल. आम्ही सर्वांना घेऊन काम करू, असं सुरेंद्र गांगण यांनी सांगितलं. आम्ही पत्रकारांना घरे देण्यासाठी घरांची योजना राबवणार आहे. अनेक पत्रकार दुरून येतात. इथे काम करतात. त्यांना घरे नाहीये. राहण्याची व्यवस्था नाहीये. त्यांच्यासाठी आम्ही योजना राबवणार आहोत. आम्ही पत्रकारांसाठी मेडिक्लेमची योजना राबवणार आहोत, असंही गांगण यांनी सांगितलं.

खांडेकरांच्या पॅनलमध्ये कोण कोण?

प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रॅटिक अलायन्सची टीम राजीव खांडेकर यांच्या नेतृत्वात लढत आहे. राजीव खांडेकर हे पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत मयुरेश गणपत्ये चेअरपर्सन, आशिष राजे व्हाईस चेअरपर्सन, सौरभ शर्मा सचिव आणि शशांक पराडे कोषाध्यक्षपदासाठी उभे आहेत. तर आशिष राणे, अनुराग कांबळे, अनिष पाटील, ज्योत्सना गणगणे, गिरीश गायकवाड, गिरीश चित्रे, स्वप्नील मिश्रा, संजय रणजीत आणि सचिन हरळकर हे व्यवस्थापकीय समितीसाठी उभे आहेत.

गांगण यांच्या पॅनलमध्ये कोण कोण?

तर सेव्ह प्रेस क्लब अलायन्सकडून सुरेंद्र गांगण हे अध्यक्षपदासाठी, एस बालकृष्णन चेअरपर्सन पदासाठी, पांडुरंग म्हस्के व्हाईस चेअरपर्सन पदासाठी, अनिल कुमार सिंग सचिव, सुधाकर काश्यप संयुक्त सचिव आणि ओम प्रकाश तिवारी कोषाध्यक्ष पदासाठी उभे आहेत. तर मॅनेजिंग कमिटी सदस्यत्वासाठी आदित्य दुबे, वैभव परब, मनिषा रेगे, अन्सारी शाहीद, मधू नैनन, पूनम अपराज, अनिता शुक्ला, स्वप्नील शिंदे, उमेश गोस्वामी आणि के जे बेन्नाचन हे उभे आहेत.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच