पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे जाहीर, मृतांमध्ये २०-२२ वर्षांचे तरुण
शनिवारी पहाटे मुंबई-पुणे महामार्गावर मोठा अपघात झाला. एक खासगी बस 500 फूट खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांची नावे जाहीर झाली आहे. अपघातात 25 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
मुंबई, गिरीश गायकवाड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस कोसळली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे 4 वाजता झालेल्या या भीषण अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरातील जयंतीचा कार्यक्रम आटोपून येत असताना हा अपघात झाला. मुंबईतील गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथकातील तरुण या खाजगी बसमधून प्रवास करत होते. दरम्यान जखमींची चौकशी करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात आहेत.
कसा झाला अपघात
पुण्यावरून मुंबईला ही खासगी बस जात होती. पहाटे 4च्या सुमारास ही बस जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागे येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे बाजूलाच असलेल्या दरीत ही खासगी बस कोसळली. ही दरी 400 ते 500 फूट खोल आहे. एवढ्या उंचावरून बस कोसळल्याने बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. या बसमधून 40 ते 45 प्रवाशी प्रवास करत होते.
ही आहेत नावे
१)जुई दीपक सावंत (वय १८, रा.दिंडोशी, गोरेगाव)
२)वीर कमलेश मांडवकर ( वय १२, रा.गोरेगाव)
३)वैभवी सुनिल साबळे
४) स्वप्निल श्रीधर धुमाळ (वय २०, रा.दिंडोशी, गोरेगाव)
५)यश सुभाष यादव (वय १८, रा.गोरेगाव)
६)सतिष श्रीधर धुमाळ (वय २३, रा.दिंडोशी, गोरेगाव)
७) मनिष राठोड (रा.चेंबूर)
८)हर्षदा परदेशी (रा.माहिम)
९) कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई
१०) अभय विजय साबळे, वय २० वर्ष, मालाड, मुंबई.
११) राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई.
१२) अनोळखी
हे आहेत जखमी
एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे