Mumbai Rain Update : पावसामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला, मुंबई संततधार, नवी मुंबईत जोरदार!

| Updated on: Jul 05, 2022 | 10:04 AM

Mumbai Rain Local Train Update : लोकल सेवा उशिराने सुरु असल्यानं रेल्वे प्लॅटफॉर्म प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

Mumbai Rain Update : पावसामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला, मुंबई संततधार, नवी मुंबईत जोरदार!
मुंबई पावसाची बॅटिंग
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मुंबईत (Mumbai rain News) सुरु असलेल्या संसतधार पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकल सेवेवर झाला आहे. मुंबईची लोकल सेवा (Mumbai Local Train Update) ही धीम्या गतीनं सुरु आहे. मध्य रेल्वे मार्गासह हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलही धीम्या गतीने सुरु आहे. दिलासादायक बाब म्हणजे रेल्वे सेवा उशिराने का होईना, सुरु आहे. त्यामुळे नोकरीवर जाण्यासाठी निघालेल्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगरातही हजेरी लावली आहे. सखल भागात पाणीही साचल्याचं पाहायला मिळालंय. तर दुसरीकडे नवी मुंबईतही (Navi Mumbai Rain Update) जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेच्या वेळापत्रकावरही पावसामुळे परिणाम झालाय. दरम्यान, लोकल सेवा उशिराने सुरु असल्यानं रेल्वे प्लॅटफॉर्म प्रवाशांची गर्दी वाढली आहे. पर्यायानं लोकलमध्येह नेहमीपेक्षा अधिक गर्दीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय.

सकाळपासून पावसाचा जोर

आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडतोय. अंधेरी सबवेच्या आत पावसाचे पाणी हळूहळू भरू लागलंय. भुयारी मार्गात धोक्यापेक्षा जास्त पाणी भरले की अंधेरी सबवे बंद करण्यात येतो आहे. सबवेच्या दोन्ही बाजूला वाहतूक पोलीस आणि बीएमसीचे कर्मचारी तैनात आहेत. सबवेतून पाणी काढण्याचे कामही पंपिंग मशिनद्वारे केले जात आहे. वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी खबरदारी बाळगली जातेय. तसंच भुयारी मार्गात अधिक पाणी भरताच वाहतूक पोलिस अंधेरीच सबवेचा मार्ग बंद करून हा मार्ग दुसऱ्या रस्त्यावरून डायवर्ट करत आहेत.

हे सुद्धा वाचा

नवी मुंबईतही जोरदार

नवी मु्ंबईतही सोमवारपासून पावसाने बॅटिंग केलीय. मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपून काढलं आहे. त्यामुळे वातावरणातही कमालीचा गारवा पसरला आहे. नवी मुंबईसह पनवलेमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सखल भाग जलमय झाले होते.

वसई विरारही जलमय

पुढचे काही तास महत्त्वाचे

कोकणासह मुंबई आणि उपनगरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरामधील सखल भाग जलमय झाले असून खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं जातंय. शुक्रवारपर्यंत मुंबई आणि कोकणा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वाचा पावसाचे लाईव्ह अपडेट्स : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी! पावसामुळे कुठे काय स्थिती : LIVE Updates