Mumbai Health : मुंबईकर स्वाइन फ्लूने बेजार! रुग्णवाढीसोबत मृत्यूचीही नोंद, आतापर्यंत 6 बळी! एकट्या जुलैमध्ये 4 मृत्यू

सचिन गवाणे

| Edited By: |

Updated on: Aug 25, 2022 | 7:56 AM

Mumbai Swine Flu News : 14 ते 21 ऑगस्ट या सात दिवसात मुंबई तब्बल 97 नव्या मलेरीया रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता मलेरीया रुग्णांची एकूण संख्या 509 झाली आहे. हा आकडा अधिक वाढू शकतो, अशीही भीती व्यक्त केली जातेय.

Mumbai Health : मुंबईकर स्वाइन फ्लूने बेजार! रुग्णवाढीसोबत मृत्यूचीही नोंद, आतापर्यंत 6 बळी! एकट्या जुलैमध्ये 4 मृत्यू
प्रातिनिधिक फोटो...

मुंबई : मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात साथीच्या (Viral dieses) आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या (Corona) महामारीनंतर दोन वर्षांनी मुंबईत स्वाइन फ्लूच्या (Mumbai Swine Flue) दोन मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जुलैमध्ये स्वाईन फ्लूच्या 105 रुग्णांची नोंद झाली होती. आता 1 ते 21 ऑगस्ट दरम्यान एच १ एन १ म्हणजेच स्वाइन फ्लूच्या 163 रुग्णांची नोंद झाली आहे, तर जानेवारी ते ऑगस्ट या काळात एकूण 272 रुग्ण आढळलेत. स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरीया, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचे वाढते रुग्ण धोक्याची घंटा मानली जातेय. पावसाच्या दिवसात मुंबईत साथीच्या आजारांचा धोका वाढतो. त्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी स्वच्छ, निर्जंतुकीकरण आणि पाणी साठू न देण्याच्या दृष्टीनेही पावलं उचलली जातात. मात्र हे सर्व करुनही यंदा साथीच्या आजारांचा धोका वाढतोय. यावर्षी आतापर्यंत सहा रुग्ण दगावले असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यातीन दोन हे प्रत्येकी स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण होते. हे चार मृत्यू एकट्या जुलै महिन्यातील असल्याची धक्कादायक बाबही समोर आलीय.

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत मुंबईत साथीच्या आजारांचे एकूण सहा बळी गेले आहेत. त्यातील प्रत्येकी दोन रुग्ण हे स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे होते. हे बळी जुलै महिन्यात झाल्याची नोंद करण्यात आली असून त्या उर्वरीत दोनपैकी प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू हा मलेरीया आणि लेप्टोस्पायरोसिसमळे झाला.

पालिका रुग्णालयात झालेल्या एकूण 28 मृत्यूंपैकी 6 रुग्णांचा मृत्यू हा साथीच्या आजाराने झाल्याचं समोर आलंय.

हे सुद्धा वाचा

  1. 19 जून – 8 वर्षांच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू
  2. 7 जुले – 38 वर्षीय व्यक्ती डेंग्यूमुळे दगावली
  3. 11 जुलै – स्वाईन फ्लूमध्ये 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
  4. 26 जुलै – 44 व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू
  5. 4 जुलै – 34 वर्षीय व्यक्तीचा लेप्टोस्पायरोसिसमुळे मृत्यू
  6. 23 जुलै – 55 व्यक्तीचा मलेरीयामुळे मृत्यू

काळजी घ्या, रुग्णसंख्या वाढतेय!

दरम्यान, ऑगस्ट 14 ते 21 या सात दिवसात मुंबई तब्बल 97 नव्या मलेरीया रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता मलेरीया रुग्णांची एकूण संख्या 509 झाली आहे. हा आकडा अधिक वाढू शकतो, अशीही भीती व्यक्त केली जातेय. कारण पालिकेकडून सांगण्यात आलेल्या आकडेवारीत खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची माहिती समाविष्ट करण्यात आलेली नाही. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णांनी वेळीच उपचार घेण्याची, आजार अंगावर न काढण्याची आणि खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचं सांगितलं जातंय. त्याचप्रमाणे तापाच्या कोणताही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळी औषधोपचार करावेत, असंही जाणकारांनी म्हटलंय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI