AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंब्र्यातील शाखेवर बुलडोझर फिरवण्याचं पाप केलं पाप केलं, या सगळ्याचा हिशोब होईल; राऊतांचा शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut on CM Eknath Shinde : हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक आहे. हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात. अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केलाय. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदेगटावर निशाणा साधला आहे. वाचा...

मुंब्र्यातील शाखेवर बुलडोझर फिरवण्याचं पाप केलं पाप केलं, या सगळ्याचा हिशोब होईल; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 08, 2023 | 11:22 AM
Share

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी,  मुंबई | 08 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंब्र्यातील शाखेवर बुलडोझर फिरवण्याचं पाप केलं पाप केलं, या सगळ्याचा हिशोब होईल, इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसंच उद्धव ठाकरे हे मुंब्र्यातील शाखेला भेट देणार असल्याचं म्हटलं आहे. मुंब्र्यातील ठाकरे गट शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर चालवण्यात आला. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

संजय राऊत यांचं ट्विट जसंच्या तसं

हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात. हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे.शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे.त्यावर बुलडोझर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे.मुंब्रा येथे शाखेवर बुलडोझर फिरवून ज्यांनी पाप केले त्यांचा हिशोब होईल.हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक आहे.11 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंब्रा शाखेला भेट देत आहेत..तुमच्या बुलडोझर पेक्षा स्वाभिमानी मनगटातील बळ महत्वाचे..हिशोब होईल! 11 नोव्हेंबर मुंब्रा शाखा.. जय महाराष्ट्र

“यांना लाज वाटत नाही का?”

आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुंब्रा भागात शिवसेना शाखा तोडली आहे महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारचं स्ट्रक्चर उभं आहे. बेकायदेशीर सरकार चालवत आहे त्याच्यावरती बुडोझर चालवण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या शाखेवरती बुलडोजर फिरवतात त्यांना लाज वाटत नाही का?, असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

राऊतांचं शिंदेंना आव्हान

बाळासाहेबांच्या शाखा आजही निष्ठावंत शिवसैनिक त्या ठिकाणी बसत आहे. मुख्यमंत्री जम्मू-काश्मीर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण करत आहे आणि तुमच्या मुंब्रा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळे बाळासाहेबांचे पुतळे, फोटो असलेल्या शाखांवर बुलडोझर फिरवत आहे .महाराष्ट्रात ही मोगलाई सुरू आहे का? शाखा तोडत आहेत तुमच्यात हिम्मत असेल तर समोर या…, असं आव्हान संजय राऊत यांनी शिंदे यांना दिलं आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली