AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on Sadabhau Khot Statement : खासदार संजय राऊत यांनी सदाभाऊ खोतांवर निशाणा साधला आहे. सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा, असं संजय राऊत म्हणाले. तसंच भाजपवरही संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर...

सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा; संजय राऊतांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत, संजय राऊतImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 07, 2024 | 10:55 AM
Share

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, असं संजय राऊत म्हणालेत. पवार साहेबांसारखा नेता हा राज्यात नाही तर देशाच्या राजकारणातला भीष्मपिता आहे हा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर अशा प्रकारचा वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शरमेन खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांचा हल्लाबोल

ज्या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा. आपण समाजकारणात राजकारणात काय केलं मला कोणाशी व्यक्तिगत काही बोलायचं नाही. माननीय शरद पवार साहेब या देशाचे सर्वोच्च नेते आहेत. या सदा खोतच्या बापाने म्हणजे नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री यांनी बारामती जाऊन शरद पवार हे आपले कसे राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेत आहे हे वारंवार सांगितलं आहे. पवारसाहेबांचं बोट पकडून आम्ही कस राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलं, असं संजय राऊत म्हणालेत.

अत्यंत महत्त्वाची गोष्ट याच भाजप सरकारने माननीय शरद पवारसाहेबांना देशातला भारतरत्न नंतरचा सर्वोच्च नागरिक किताब पद्मविभूषण दिला आहे. तो दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च किताब आहे. जो त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कामाबद्दल सामाजिक कृषी शैक्षणिक कामाबद्दल हा किताब त्यांना दिला. पवार साहेबांनी काहीच केलं नाही असं हे जे टमरेला म्हणत आहेत त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षाचा कामाजोगा पाहिला पाहिजे, अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केलाय.

सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान काय?

जत विधानसभा मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी काल सभा झाली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत एकेरी भाषा वापरली. त्यांनी शरद पवारांच्या आजारपणावरून टीका केली. अरे पवारसाहेब तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी कारखाने हाणले. बँका हाणल्या. सूत गिरण्या हाणल्या. पण पवाराला मानावं लागेल. एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतंया, मला महाराष्ट्र बदलायचाय. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला तुला चेहरा बदलायचाय? कसला चेहरा? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?, असं विधान सदाभाऊ खोत यांनी काल केलं. त्यांच्या या विधानानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.