AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार साहेबांवर खालच्या पातळीवरची टीका केली तर… अजित पवार कडाडले, सदाभाऊ खोतांना फटकारलं

राजकीय वाचाळवीर महाराष्ट्राला काही नवे नाहीत, रोज कोणी ना कोणी काहीतरी बोलतच असतो. पण एखाद्याच्या दिसण्यावरून, वागण्यावरून केलेली वैयक्तिक टीका सगळ्यांनाच झोंबते, जनतेलाही ते आवडत नाही. असंच काहीस महायुतीच्या सभेत जतमध्ये सदाभाऊ खोत यांच्यासोबतही झालं.

पवार साहेबांवर खालच्या पातळीवरची टीका केली तर... अजित पवार कडाडले, सदाभाऊ खोतांना फटकारलं
अजित पवार कडाडले
| Updated on: Nov 07, 2024 | 8:12 AM
Share

विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे 13 दिवस उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाक लावला आहे, सभांचा धुरळा उडालाय. याच राजकीय संभादरम्यान राजकीय नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात, कधी चिखलफेकही होते. मात्र बोलताना माणसाचं भान सुटलं तर जीभ घसरते. राजकीय वाचाळवीर महाराष्ट्राला काही नवे नाहीत, रोज कोणी ना कोणी काहीतरी बोलतच असतो. पण एखाद्याच्या दिसण्यावरून, वागण्यावरून केलेली वैयक्तिक टीका सगळ्यांनाच झोंबते, जनतेलाही ते आवडत नाही. असंच काहीस महायुतीच्या सभेत जतमध्ये सदाभाऊ खोत यांच्यासोबतही झालं.

प्रचारसभेत तावातावाने भाषण करताना त्यांनी राज्यातीलच नव्हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन बोलत जे वक्तव्य केलं ते सगळ्यांनाच झोंबलं आणि महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटत आहेत. शरद पवार यांचे पुतणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही हे वक्तव्य रुचलं नसून त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असली , अजित पवार आणि इतर पवार कुटुंबात मतभेद झाले असले, अजित दादा गट महायुतीत सामील असला तरी शरद पवार यांच्यावरील वैयक्तिक पातळीवरील ही टीका मात्र अजित पवार यांना आवडलेली नाही.

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अजित पवार यांनी एक पोस्ट शेअर करत सदाभाऊ खोत यांना कानपिचक्या दिल्या आहेत. खोत यांचं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे असे म्हणत अजित पवार यांनी त्यांना चांगलंच फटकारलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

‘ ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही’ अशा शब्दांत अजित पवार यांनी थेट इशाराच दिला आहे.

सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य काय ?

जतमधील महायुतीच्या सभेत बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पातळी सोडली. शरद पवार यांच्या आजारपणावरुन वक्तव्य करताना “आता महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”, असा खोचक सवाल खोत यांनी विचारला. “महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुम्हाला कसला चेहरा पाहिजे?” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत खोत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. “ पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.